Home > Entertainment > "Mrs .Chatterjee Vs Norway "राणी मुखर्जीचा डोळ्यात पाणी आणणारा नवा सिनेमा

"Mrs .Chatterjee Vs Norway "राणी मुखर्जीचा डोळ्यात पाणी आणणारा नवा सिनेमा

Mrs .Chatterjee Vs Norway राणी मुखर्जीचा डोळ्यात पाणी आणणारा नवा सिनेमा
X

बॉलीवूड मध्ये अनेक सिनेमे येतात जातात पण लक्षात राहण्याजोगे फार कमी आहेत . अभिनेत्रींचंही अगदी तसंच आहे. पण काही अभिनेत्री या नेहमी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात .जसं कि राणी मुखर्जी ,तिने तिच्या कौशल्याने आजवर अनेक चित्रपट गाजवले आहेत. आता राणीचा एक नवा चित्रपट येत आहे . ज्यामध्ये ती एका आईची भूमिका साकारत आहे . अशी आई जी आपल्या मुलांसाठी आणि परिवारासाठी काहीही करायला तयार आहे .पण हे कुटुंब रवाना होतं नॉर्वेला आणि तिथे तिची मुले नॉर्वेच्या बालहक्कांच्या नियमानुसार हिसकावून घेतली जातात.आणि लढाई सुरु होते एका आईची ...

या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये परदेशी नागकीकत्व आणि परदेशातील अनेक कायदे कानून आणि आपल्या देशातील कायदा यामध्ये असलेली तफावत दिसून येते . हल्ली भारत सोडून परदेशी जाणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता परिस्थिती येत्या काही काळात गंभीर होणार आहे .आपल्याकडे आई म्हणून असणाऱ्या भावना म्हणजे आपल्या बाळाला आपल्या हाताने घास भरवणं ,आईच्या अंगावरच दूध पाजणे ,अंघोळीनंतर त्याला पदराने पुसणे या गोष्टी आपल्या भारतात एक आई म्हणून मायेच्या मानल्या जात असल्या तरी परदेशात मात्र याबद्दल समज पूर्णतः वेगळा आहे . याचीच लढाई लढताना एक आई दाखवली आहे .

नक्कीच राणी मुखर्जी पुन्हा एकदा धुमाकूळ घालेल असंच चित्र या ट्रेलर मधून दिसत आहे . एक दिवसात ११ लाखांहून अधिक views या ट्रेलरला मिळाल्या आहेत . तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा ...

Updated : 24 Feb 2023 7:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top