Home > Entertainment > मिताली मयेकरचा खास लुकमध्ये व्हिडिओ

मिताली मयेकरचा खास लुकमध्ये व्हिडिओ

मिताली मयेकरचा खास लुकमध्ये व्हिडिओ
X

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांना ओळखले जाते. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या मिताली मयेकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बार्बी’ या चित्रपटावर मितालीने हा खास व्हिडीओ बनवला आहे. ‘बार्बी’ मध्ये गुलाबी रंगाची थीम अधोरेखित केली गेली आहे. मितालीने या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाच्या ६ साड्या विविध स्टाइलमध्ये नेसल्या आहेत. मितालीने अशा प्रकारे साड्या नेसून बार्बीचे भारतीय व्हर्जन असं म्हणत व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओला तिने “जर बार्बी भारतीय असती तर?” असे कॅप्शन देखील दिले आहे. या व्हिडीओवर तिचा नवरा आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने यांनी खास कमेंट केली आहे. तो लिहितो, “बार्बी शोबत लगीन करायचंय…करू दे ना वं.” त्याच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिद्धार्थला मितालीने लाडात ‘ओके’ असे उत्तर दिले आहे.

Updated : 23 July 2023 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top