Home > Entertainment > Miss World 2024 : चा ग्रँड फिनाले आणि Sini Shetty ने होस्टला दिलेलं उत्तर चर्चेत

Miss World 2024 : चा ग्रँड फिनाले आणि Sini Shetty ने होस्टला दिलेलं उत्तर चर्चेत

Miss World 2024 : चा ग्रँड फिनाले आणि Sini Shetty ने होस्टला दिलेलं उत्तर चर्चेत
X

मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 च्या ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले. देश विदेशातून लोक या फिनालेसाठी पोहचले होते. अनेक सेलिब्रिटी हे या सोहळ्यामध्ये धमाकेदार परफॉर्म करताना दिसले. तर करण जोहरने या फिनालेसाठी सूत्रसंचालन केले. तब्बल 28 वर्षांनंतर मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनालेचे आयोजन हे भारतामध्ये करण्यात आले. भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी ही करताना दिसली. शोच्या होस्टने तिला एक प्रश्न विचारला ज्याचे उत्तर सिनीने पूर्ण आत्मविश्वासाने दिले.

मुंबईत जन्मलेली आणि शिक्षण घेणारी सिनी शेट्टी ही एक हुशार आणि सुंदर तरुणी आहे. मिस इंडिया 2022 चा किताब जिंकल्यानंतर तिला मिस वर्ल्ड 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सिनीने स्पर्धेतील प्रत्येक टप्प्यावर उत्तम कामगिरी करत टॉप 8 मध्ये आपली जागा निश्चित केली. करण जोहर याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तिने आत्मविश्वासाने दिली.

"सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रचार कसा करता येईल?" असा प्रश्न सिनीला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सिनी शेट्टी ही म्हणाली की, सोशल मीडिया हा सध्या खूप जास्त शक्तिशाली आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बदल घडवू शकतो आणि जनजागृती देखील करू शकतो.

यासाठी आपण जनरल झेडची देखील मदत घेऊ शकतो. हेच नाही तर मी स्वत: जनरल झेडचा एक भाग देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून महिलांना प्रोत्साहन नक्कीच दिले जाऊ शकते. एक माध्यम आणि बदलण्याची शक्ती नक्कीच सोशल मीडियावमध्ये असल्याचे तिने म्हटले. सिनी शेट्टी ही सध्या तूफान चर्चेत आहे.

सिनी शेट्टी हिच्या यशामागे खूप मेहनत आणि संघर्ष आहे. ती तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी तिचे विचार निश्चितच महत्त्वाचे आहेत.

मिस वर्ल्ड 2024 बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसले तरीही सिनी शेट्टीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तिचा आत्मविश्वास आणि विचारांची स्पष्टता निश्चितच प्रेरणादायी आहे.

Updated : 10 March 2024 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top