Home > Entertainment > मिस जपान 2024 कॅरोलिना शिनो हिने मुकुट परत केला!

मिस जपान 2024 कॅरोलिना शिनो हिने मुकुट परत केला!

मिस जपान 2024 कॅरोलिना शिनो हिने मुकुट परत केला!
X

नुकतेच मिस जपान 2024 स्पर्धा जिंकून कॅरोलिना शिनो यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, लवकरच एका स्थानिक मासिकाने शिनो यांच्या कथित प्रेमसंबंधांचा खुलासा केला आणि वाद निर्माण झाला. जपानमधील प्रभावशाली व्यक्तिमत्व डॉ. ताकुमा मेदा यांच्यासोबत शिनो यांचे प्रेमसंबंध असल्याचे या मासिकाने उघड केले. डॉ. ताकुमा मेदा हे विवाहित असल्याने शिनो यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

स्पर्धेच्या आयोजकांनी शिनो यांना पाठिंबा देत डॉ. मेदा यांच्या वैवाहिक स्थितीची माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या वादामुळे शिनो यांना चाहत्यांच्या बरोबर टिकाकरांची माफी मागावी लागली आहे. शिनो यांनी इंस्टाग्रामवर जाहीर माफी मागत मिस जपान 2024 चा मुकुट परत केला आहे. हा मुकुट मिस जपान असोसिएशनने त्यांच्या ताब्यात घेतला असल्याच समजत आहे.

मिस जपान असोसिएशनने या प्रकरणावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. "डॉ. ताकुमा मेदा यांच्या पत्नी, कुटुंबीय आणि स्पर्धेतील सहभागी यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोंधळ आणि भीतीमुळे सत्य लवकर सांगणे अशक्य झाले," असे मिस जपान असोसिएशनच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मिस जपान 2024 स्पर्धेचे विजेतेपद रिकामे झाले आहे. हा ताज आता कोणच्या डोक्यावर जाणार आणि यापुढे काय निर्णय घेतला जाईल हे मिस जपान असोसिएशनकडून लवकरच जाहीर केले जाईल अशी शंका वर्तवली जाते.

Updated : 9 Feb 2024 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top