Home > Entertainment > मेकअप शिवाय सौंदर्य स्पर्धेत उतरलेली मेलीसा

मेकअप शिवाय सौंदर्य स्पर्धेत उतरलेली मेलीसा

मेकअप शिवाय सौंदर्य स्पर्धेत उतरलेली मेलीसा
X


सौंदर्य स्पर्धेत कित्येक तरुणी आजकाल सहभागी होताना दिसतात. प्रत्येक देशाची एक वेगळी सौंदर्यवती या स्पर्धांमध्ये निवडली जाते. पण या स्पर्धेत कुठलीच सौंदर्यवती मेकअप शिवाय आज पर्यंत आली नाही.पण हे धाडस केले आहे मेलीसा रौफ या वीस वर्षीय तरुणीने . मिस इंग्लंड 2022 ची अंतिम फेरी विदाऊट मेकअप तिने गाठली आहे.आपण स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये विदाऊट मेकअप उतरणार असल्याचे ती स्पष्टपणे सांगते.

खरंतर मिस इंग्लंड सौंदर्य स्पर्धेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याचं आयोजकांनी म्हटले आहे. या सौंदर्य स्पर्धेमध्ये बाह्य सौंदर्याचा कस लागतो. बुद्धिमत्ता सुद्धा तपासली जाते.पण आपली बुद्धिमत्ता आणि सौंदर्य याचा मेळ साधून अनेक सौंदर्यवती जिंकतात.पण मेलिसाने मेकअप कोणी कंपल्सरी केला ? असं विचारत मेकअप न करता स्पर्धेत उतरण्याचा निर्धार केला आहे .

यामुळे सामान्यांना हा प्रश्न पडला आहे की मेकअपशिवाय एखादी सौंदर्यवती सौंदर्य स्पर्धेत उतरूच कशी शकते ? मेलीसा लंडनमध्ये राहणारी असून ती राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारी वीस वर्षाची तरुणी आहे.तिने आपल्या इंस्टाग्राम वर मेकअप शिवाय फोटो टाकून मेलीसा रौफ मेकअप फ्री सांगा सुंदर दिसत नाही का ? या आशियाची पोस्ट शेअर केली आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रात मुलींना मेकअप शिवाय जाण्याचा मोठा दबाव येतो त्यामुळे या दबावाखाली मुली मेकअप करत असतात. स्वतःच्या त्वचेवर शंभर टक्के प्रेम करणारी मेलिसा ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ही मेकअप विना स्पर्धेला सामोरे जाणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगते. मी जशी आहे तशी मला आवडते. त्यामुळे जगासमोर येण्यात मला कसलीही भीती वाटत नाही असं मेलीसा धाडसाने सांगते.

Updated : 29 Aug 2022 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top