Home > Entertainment > साठी ओलांडल्यानंतर देवानंदच्या प्रेमात पडल्या मीना कर्णिक

साठी ओलांडल्यानंतर देवानंदच्या प्रेमात पडल्या मीना कर्णिक

देनानंद ते शाहरुख खान प्रेमाच्या सफरी बद्दल मीना कर्णिक यांनी मॅक्स वुमनशी संवाद साधला आहे. त्यात त्यांनी देवानंद ते शाहरुख खान व्हाया मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रेमाचा प्रवास सांगितला आहे.

साठी ओलांडल्यानंतर देवानंदच्या प्रेमात पडल्या मीना कर्णिक
X

चित्रपट सिनेसृष्टित अनेक दिग्गज स्टार कलाकार होऊन गेले आहेत. ज्यांनी बॉलीवूड आणि मराठी चित्रपट विश्वावर अधिराज्य गाजवले आहे, यामध्ये देवानंद, ऋषि कपूर, राजेश खन्ना, लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. तर सद्याच्या घडीला अनेक स्टार एकावर एक धडाकेबाज चित्रपट प्रदर्शित करत बॉलीवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील आपली बादशाहत राखून आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अशोक सराफ यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. देवानंद,शाहरुख खान आणि अशोक सराफ या कलाकारांचे अनेक चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतील. याच चाहत्यांच्या यादीतील एक चाहत्या म्हणजे लेखिका आणि समीक्षक मीना कर्णिक, मीना कर्णिक यांच नुकतचं "प्यार का राग सुनो" या पुस्तकाचं प्रकाशन होऊन हे पुस्तक वाचकांसाठी वाचायला उपलब्ध झालं आहे. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. बॅालिवुडच्या प्रेमाचा प्रवास मांडणारे “प्यार का राग सुनो” हे पुस्तक आले आहे. देनानंद ते शाहरुख खान प्रेमाच्या सफरी बद्दल मीना कर्णिक यांनी मॅक्स वुमनशी संवाद साधला आहे. त्यात त्यांनी देवानंद ते शाहरुख खान व्हाया मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रेमाचा प्रवास सांगितला आहे.





कलाकारांबद्दल बोलतांना त्या म्हणतात आर्टिस्ट बरोबरची देवाण-घेवाण मला खूप महत्वाची वाटते. मीना कर्णिक आणि मराठी चित्रपट सृष्टितील अॅक्टिंग आणि विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांची खूप चांगली मैत्री आहे. मीना कर्णिक म्हणतात "अशोकला मी खूप पूर्वीपासून ओळखते, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या दोघांचा सेन्स ऑफ ह्यूमर कमाल होता." निवेदिता जोशी सराफ आणि अशोक सराफ यांच्या नात्यातील काही गमती देखील लेखिकेने मुलाखती दरम्यान सांगितल्या आहेत. लेखिका मीना कर्णिक म्हणतात " अशोक सराफ आणि निवेदिता जेंव्हा एकत्र मैफिलीत किंवा चर्चेत बसलेले असतात, तेंव्हा अशोक सराफ काहीच बोलत नाहीत. त्या म्हणतात अशोक सराफांना माहित नसेल तेवढं अशोक सराफांबद्दल निवेदितला माहिती आहे. या मुलाखतीत अशोक सराफ यांच तोंड भरून कौतुक केलं आहे. त्या म्हणतात अशोक सराफांचं महाराष्ट्रानं खूप कौतूक करायला पाहीजे.

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. लेखक, समिक्षक आणि पुस्तकांच्या दुनियेत मस्त सफर करणाऱ्या महिला मीना कर्णिक यांच वय बघितलं तर वयवर्षे 60 च्या पुढे गेलं असून साठी ओलांडल्यानंतर त्या देवानंदच्या प्रेमात पडल्या असल्याचं त्या सांगत आहेत. मीना कर्णिक देवानंदच्या एवढ्या प्रेमात काही प्रेमात पडल्या आहेत की, त्यांनी एका वर्षात देवानंदचे जवळपास 80 चित्रपट बघितले आहेत. "देवानंद किंवा त्याच्या नुसतं प्रेमात पडून चालणार नाही, तर त्याच्यावर पुस्तक रूपात काही करण्याचा विचार कर" निखिल वागळे यांच्या या सल्ल्यानंतर मीना कर्णिक यांनी विचार केला, आपण देवानंद ते शाहरूख अशा काही रोमान्सविषयक प्रवासाबद्दल लिहू शकतो का? ज्यामध्ये एक शमी कपूर लागतो, एक राजेश खन्ना लागतो आणि एक ऋषी कपूर लागतो या रोमॅंटिक प्रवासबद्दल मीना कर्णिक यांनी लिहायला घेतले. यामुळे एक फॉर्म तयार व्हायला लागला.

मीना कर्णिक सांगतात की त्यांनी एका वर्षात देवानंदचे जवळपास 80 चित्रपट बघितले आहेत, हे एवढे चित्रपट बघत असतांना मीना कर्णिक यांचे पती आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे मीना कर्णिक यांना म्हणतात "देवानंद किंवा त्याच्या नुसतं प्रेमात पडून चालणार नाही, तर त्याच्यावर पुस्तक रूपात काही करण्याचा विचार कर असा सल्ला निखिल वागळे देतात.

मीना कर्णिक यांना सतत वाटायचं की आपण स्वतःला थोडं प्रगल्भ केलं पाहिजे, अलीकडच्या काळात गाडी,बंगला आणि खूप पैसा कमावणे म्हणजे खूप यश संपादन करणे असे आहे. पण मीना कर्णिकांच्या मते खूप यश मिळवणं म्हणजे खुप पैसे कमवणे असं समीकरण आहे, असं त्या मॅक्स वुमनच्या संवादात सांगतात.

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. बॅालिवुडच्या प्रेमाचा प्रवास मांडणाऱ्या "प्यार का राग सुनो" या पुस्तकाचं प्रकाशन होऊन हे पुस्तक वाचकांसाठी वाचायला उपलब्ध झालं आहे. हे पुस्तक वाचकांनी नक्की वाचावं. देवानंद ते शाहरुख खान प्रेमाच्या सफरी बद्दल मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या सोबत मिना कर्णिक यांची ही धमाल मुलाखत झाली आहे. मीना कर्णिक यांची ही धमाल मुलाखत पाहण्यासाठी मॅक्स वुमनच्या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या.

Updated : 12 March 2024 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top