Home > Entertainment > "माझी तुझी रेशीमगाठ" परत सुरु होण्यामागे हे आहे कारण ...

"माझी तुझी रेशीमगाठ" परत सुरु होण्यामागे हे आहे कारण ...

माझी तुझी रेशीमगाठ परत सुरु होण्यामागे हे आहे कारण ...
X

फार कमी टीव्ही सिरीयल प्रेक्षकांच्या लक्षात राहतात .आणि त्यांच्या मनावर अधिराज्य ही गाजवतात.अगदी अशीच झी मराठीवरील एक मालिका लोकप्रिय झाली. पण तीच लोकप्रिय मालिका अचानक बंद होण्याचा निर्णय घेण्यात आला होता .त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते.

चाहत्यांनी मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आणि झी मराठीने ती मान्य केली.गेल्या काही महिन्यात या वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत .अर्थात टीआरपी खूप गरजेचा असतो . 'अप्पी आमची कलेक्टर' तसेच "सातव्या मुलीची सातवी मुलगी" आणि 'दार उघड बये' या मालिका सुरू होणार आहेत .नव्या मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुनी मालिका निरोप घेते.

झी मराठीवरील "माझी तुझी रेशीमगाठ " ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली.अचानक ही मालिका बंद होणार म्हटल्यावर, प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मालिका सुरू ठेवण्याबद्दल मागणी केली आणि अखेर जी वाहिनी प्रेक्षकांचं मालिक वरील प्रेम पाहून मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे .

आता ही "रेशीमगाठ तुटायची नाय" असं पोस्टर पुन्हा व्हायरल झालं .त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ ही लोकप्रिय मालिका पुन्हा 19 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6.30 वाजता सुरू राहणार आहे.चाहत्यांची नाराजी आता दूर झाली आहे.

Updated : 16 Sep 2022 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top