Home > Entertainment > मराठी चित्रपट, बॅालिवूड ते 'कान्स' ! छाया कदम यांचा प्रेरणादायी प्रवास; ' लापता लेडीज मधील भूमिकेविषयी म्हणाल्या..

मराठी चित्रपट, बॅालिवूड ते 'कान्स' ! छाया कदम यांचा प्रेरणादायी प्रवास; ' लापता लेडीज मधील भूमिकेविषयी म्हणाल्या..

मराठी चित्रपट, बॅालिवूड ते कान्स ! छाया कदम यांचा प्रेरणादायी प्रवास;  लापता लेडीज मधील भूमिकेविषयी म्हणाल्या..
X

'फॅंन्ड्री', 'सैराट',झुंड, रेडू ते लापता लेडिज अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच छाया कदम या सध्या 'लापता लेडीज' या चित्रपटातील खास भूमिकेमुळे चर्चेत आहेत. हिंदी चित्रपटामध्ये नाविन्यपूर्ण भूमिका साकारुन त्यांनी या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी नाटकापासून सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास कान्स अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचला आहे



तसेच त्यांनी 'लापता लेडीज' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी माहिती दिली आमि चित्रपटाच्या सेटवरील देखील अनेक किस्से सांगितले. छाया कदम यांनी नागराज मंजूळे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'झुंड' चित्रपटात बॅालिवुडचे महानायक अमिताब बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी बोराडे (अमिताब बच्चन) यांच्या पत्नीची (रंजना बोराडे) भूमिका साकारली होती. तसेच सध्या देशभरात दिग्दर्शिका आणि निर्माती किरण राव यांच्या 'लापता लेडिज' या चित्रपटाची चर्चा आहे.

या चित्रपटात छाया कदम यांनी 'मंजू माई' ही व्यक्तीरेखा साकारली असून छाया कदम यांना देशभर प्रेम मिळत आहे.




Updated : 17 May 2024 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top