Home > Entertainment > अभिनेत्री हीना पांचाळला रेव्ह पार्टीत अटक, नाशीक पोलिसांची कारवाई

अभिनेत्री हीना पांचाळला रेव्ह पार्टीत अटक, नाशीक पोलिसांची कारवाई

अभिनेत्री हीना पांचाळला रेव्ह पार्टीत अटक, नाशीक पोलिसांची कारवाई
X

मित्राच्या वाढदिवसानिमीत्त रेव्ह पार्टी करण मराठी बीग बॉस 2 मधिल अभिनेत्री हीना पांचाळला चांगलच महागात पडलं आहे. नाशीकमधील इगतपुरी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दोन वाजता नाशीक पोलिसांनी ही कारवाई केली.

नाशीक पोलिसांनी अकटकेलेले 22 जण चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. यात हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली आहे.

वाढदिवसानिमित्त मित्रांना घेऊन इगतपुरी गाठली. केक कापल्यानंतर पार्टीत सारेच जण अंमली पदार्थांच्या नशेत तल्लीन झाले. इतक्यात पोलिसांची धाड पडली आणि पार्टी उधळून लावली. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. या पार्टीची चाहूल पोलिसांना लागली. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली.

Updated : 28 Jun 2021 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top