Home > Entertainment > मानाच्या 'ग्रॅमी' पुरस्कारांत नेहा महाजनच्या सितारीचा डंका

मानाच्या 'ग्रॅमी' पुरस्कारांत नेहा महाजनच्या सितारीचा डंका

मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांत नेहा महाजनच्या सितारीचा डंका
X

नेहा महाजन अभिनेत्री असण्याबरोबरच नेहा उत्तम सितार वादक आहे. तिच्या याच कलेने तिचा डंका साता समुद्रापार वाजवला आहे. नेहा महाजन आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या 'Pausa' या अल्बमला मानाच्या 'ग्रॅमी' पुरस्कारांत नॉमिनेशन मिळाले आहे. रिकीने नेहाकडून त्याच्या या अल्बमसाठी सितारची रेकॉर्ड मागवली होती.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याकारणाने नेहाने मुंबईतच तिच्या पद्धतीने या गाण्याच्या गरजेनुसार सितार वादनाची तयारी केली. प्रसन्ना विश्वनाथन या साऊंड रेकॉर्डिस्टच्या मदतीने तिने हे सितार वादन रेकॉर्ड करत ते रिकीपर्यंत पोहोचवले होते.

नेहाला तिच्या वडिलांकडून सितारवादनाचे धडे घेतले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत नेहाने नामांकनाची मोठी बातमी चाहत्यांना सांगितली. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://www.instagram.com/p/CIA8SdEpKtY/?utm_source=ig_web_copy_link

Updated : 28 Nov 2020 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top