Home > Entertainment > मराठी अभिनेत्रींना झालंय तरी काय? म्हणतायत #BanLipstick…

मराठी अभिनेत्रींना झालंय तरी काय? म्हणतायत #BanLipstick…

मराठी अभिनेत्रींना झालंय तरी काय? म्हणतायत #BanLipstick…
X

अभिनेत्री तेजस्विनी पंडित, सोनाली खरे आणि प्राजक्त माळी या तिघीही मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. तेजस्विनी आणि सोनाली यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. प्राजक्ता देखील मालिका, चित्रपटातून आपल्या समोर आली आहे. सध्य ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय. या तिघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्या पोस्ट करतात. नुकतंच या तिघींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

तेजस्विनी पंडित, सोनाली खरे आणि प्राजक्ता माळी या तिघींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या तिघींनीही मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही, असे म्हणत स्वत:च्या ओठावरील लिपस्टिक पुसली आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना माझा लिपस्टिकला विरोध आहे. #BanLipstick ! असा हॅशटॅग वापरत पोस्ट केली आहे.

या तिघींनीही हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. "आता हे काय नवीन, असं ही, मास्क लावल्यावर कुठे दिसते लिपस्टिक?" असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने "मग लावलीच कशाला??? आणि लावायची होती तर पुसलीच कशाला??? काहीही करतात लोकं," अशी प्रतिक्रीया दिली आहे.

तेजस्विनी आणि सोनाली यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमागे त्यांचा नेमका काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राजक्ताने देखील "माझा तेजस्विनीला पाठिंबा आहे." म्हणत पोस्ट केली आहे. एखाद्या आगामी चित्रपट आणि नाटकाच्या प्रमोशनसाठी त्या तिघीही लक्ष वेधून घेत असल्याचे बोललं जात आहे. सध्या त्या तिघींच्या व्हिडीओ प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत.


मात्र त्यांचे हे व्हिडीओ नेमके कशासाठी आहेत याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. त्यांचे हे व्हिडीओ प्रमोशनचाच एक भाग असल्याचे म्हटलं जात असलं तरी तेजस्विनी आणि सोनाली कोणत्या चित्रपटात किंवा नाटकात झळकणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्राजक्ताचे मात्र काही चित्रपट येत्या काही काळात येणार आहेत परंतू तिने तेजस्विनीच्या समर्थनार्थ हा व्हिडीओ बनवल्याने या व्हिडीओचा आणि त्या चित्रपटांचा काही संबंध असेल असे वाटत नाही. त्यामुळे सध्या प्रेक्षक यामागे नेमकं काय कारण आहे हे शोधताना दिसत आहेत.

Updated : 5 Dec 2021 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top