Home > Entertainment > फॅन म्हणून काहीही कराल का?

फॅन म्हणून काहीही कराल का?

फॅन म्हणून काहीही कराल का?
X

एखादा अभिनेता, अभिनेत्री, क्रिकेटर किंवा कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला व्यक्ती असेल तर त्यांचे फॅन फॉलोवर्स असतात. सिनेक्षेत्रातील लोकांचं तर विचारूच नका, यांचा लोकांवर इतका प्रभाव आहे की लोक त्यांना भेटण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. हे लोक जिथे कुठे दिसतील तिथे त्यांना भेटण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी होते. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीचे आयुष्य हे असंच असतं. पण या लोकांना देखील खाजगी आयुष्यात असतं, त्यांना देखील कुटुंब असतं, जाऊदे याचा विचार कोण करतंय...

आता हल्ली एक नवीन फॅड आलं आहे अभिनेता, अभिनेत्री किंवा कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती विमानतळावरून कुठे बाहेर जात असतील किंवा येत असतील तर त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ केले जातात. आणि हे व्हिडिओ पुन्हा समाजमाध्यमांवर व्हायरल केले जातात. आता असाच अभिनेत्री मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या Airport मधून बाहेर आल्या आणि त्यानंतर त्यांना चाहत्यांनी गराडा घातला. आता अनेक लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते त्याच लोकांच्या गर्दीतून त्या आपला मार्ग काढत जात होत्या. यावेळी यातील एका व्यक्तीने त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि मग काय घडलं पहा...

नक्की काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती, यावेळी ती तिच्या चाहत्यांमुळे खूप नाराज होताना दिसली. खरंतर, मलाइकाला विमानतळावर पाहून तिचे चाहते उत्सुक झाले आणि तिला फॉलो करायला लागले. त्यानंतर एक व्यक्ती फोटो काढत तिच्या जवळ जाऊ लागला, तेव्हा मलायका अस्वस्थ होताना दिसली. यादरम्यान ती व्यक्ती जवळ येत असल्याचे पाहून अभिनेत्री ‘आरामात’ म्हणत निघून जाते.

व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स संतापले..

व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्सनी चाहत्यांच्या या वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हे स्वस्त चाहते कुठून येतात', तर दुसऱ्याने लिहिले की, 'हे लोक वेडे का होतात'. तसेच सर्व युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला..

मलायका अरोरा नुकतेच 'लॅक्मे फॅशन वीक' 2023 मध्ये रॅम्पवर चालली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. व्हिडिओ समोर येताच, अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली. मलायकाने या फॅशन वीकमध्ये ऑरेंज कलरचा पोशाख परिधान केला होता, ज्यामध्ये ती तिची परफेक्ट फिगर दाखवताना दिसली होती. सोशल मीडियावर त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

Updated : 17 March 2023 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top