Home > Entertainment > मी पोस्ट डिलीट करणार नाही – टिळेकर

मी पोस्ट डिलीट करणार नाही – टिळेकर

हिम्मत असेल तर ती बेसूर गाणी गाणारी भक्तांची गायिका चांगलं सुरेल श्रवणीय गाते हे अंध भक्तांनी सिद्ध करून दाखवावे आणि मग तिला संगीत रत्न,भारत रत्न पुरस्कार मिळावा म्हणून भक्तांनी मोदी सरकारकडे मागणी केली तरी माझ्या बापाचं काही जाणार नाही पण त्यासाठी आधी बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल... असं म्हणत महेश टिळेकर यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

मी पोस्ट डिलीट करणार नाही – टिळेकर
X

त्या बेसूर विश्व गायिकेवर मी पोस्ट लिहिली म्हणून भक्तांबरोबर भक्तीनिना पण मिरच्या झोंबल्या आहेत. मला स्त्री सन्मान शिकवणारे ह्या अंध भक्तांच्या पैकी या भक्तीनी ने आणि या भक्ताने माझा आणि गायिका राणु मंडल हीचा एकत्र असलेला फोटो फेसबुकवर पोस्ट करून माझ्या आणि राणू च्या चारित्र्यावर चिखलफेक केली आहे. रसिका बर्वे सारखी सुशिक्षित अडाणी बाई स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा किती आदर करते हे दिसून आलं आणि या भक्तांच्या पैकी सुप्रिया पोंतनीस, सुमेधा भट,विद्याधर दाते, उल्हास गानु, गोखले ....अश्या अनेकांनी त्यात भर घातली.

त्या कमेंट्स वाचून ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम यांना त्याकाळी विनाकारण त्रास देणारे काही विकृत कर्मठ लोकं होती तीच परंपरा जपणारे स्वतः ला अती शहाणे समजणारे आजही समाजात आहेत. सुमंत श्रीपाद सहस्त्रबुद्धे याने तर किती खालच्या भाषेत कमेंट्स करून रानू मंडल सारख्या एका गरीब गायिका चा अपमान करून यांच्या नजरेत स्त्री सन्मान काय असतो ते दाखवून दिलं आहे. स्क्रीन शॉट इथे पोस्ट मध्ये आहे. राणू मंडल आणि माझा एकत्र फोटो पाहून चारित्र्यावर संशय घेणारे ही विद्वान अंध भक्त जेंव्हा देशाचे पंतप्रधान मोदींना बॉलीवुड अभिनेत्री अगदी चिकटून खांद्याला धरून फोटो काढतात, तेंव्हा ते फोटो पाहून या अंध भक्तांच्या मधला स्त्री सन्मान कुठं गेला? त्यावेळी का त्यांनी मोदींच्या चारित्र्यावर संशय घेतला? का त्या श्रीमंत नट्या बरोबरचे देशाच्या मोठ्या व्यक्तीचे ते फोटो पाहून तो त्यांना सुसंस्कृतपना वाटला आणि मी त्या गरीब गायिका बरोबर फोटो काढला तर तो व्यभिचार?

माझ्या फेसबुक प्रोफाईल वर पगडी घातलेला फोटो पाहून एका भक्तिनिने बामणी पगडी आहे अशी टीका केली. पगडी काय विशिष्ट लोकांनीच घातली पाहिजे असा नियम आहे का? की ठराविक लोकांचीच मक्तेदारी आहे पगडी घालण्याची? अंध भक्तांनो ती पगडी मला सन्मानाने घालण्यात आली आहे. कला क्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल पुणे महानरपालिकेच्या वतीने काही वर्षांपूर्वी माझा मानपत्र पगडी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. पण हे या अंध भक्तांना माहीत नसणार आणि जरी माहीत असेल तरी सोयी प्रमाणे हे विसरणार. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या बरोबर माझे फोटो पाहून त्या वर टीका करून झाल्यावर या भक्तांनी आता राणू मंडल सारख्या गायिके बरोबर माझ्या फोटोवर टीका करून हेच सिद्ध केलं आहे की भक्तांच्या लाडक्या गायिकेची खरी पात्रता मी सांगितल्या मुळे यांना झालेल्या दुःखाच्या वेदना किती तीव्र आहेत अजून. मला स्त्री सन्मान शिकवणाऱ्या भक्तांनो राजमाता जिजाऊ आऊसाहेब, अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान करणारे माझ्या सारखे सिंधुताई सपकाळ,स्मिता पाटील, शारदाबाई पवार मासाहेब ठाकरे अश्या अनेकांच्या कामापुढे नतमस्तक होतात. स्वतःचे छंद आवड पूर्ण करण्यासाठी पती मुख्यमंत्री असल्याचा फायदा न करून घेणाऱ्या सुसंस्कृत, शालीनता, घरांदाजपणा जपणाऱ्या काही स्त्रिया आहेत ज्यांच्या कडे पाहून आपली माता भगिनी असल्याची भावना मनात निर्माण होते आणि त्यांचा एक स्त्री म्हणून सन्मान कुणी न सांगताही राखला जातो.

हिम्मत असेल तर ती बेसूर गाणी गाणारी भक्तांची गायिका चांगलं सुरेल श्रवणीय गाते हे अंध भक्तांनी सिद्ध करून दाखवावे आणि मग तिला संगीत रत्न,भारत रत्न पुरस्कार मिळावा म्हणून भक्तांनी मोदी सरकारकडे मागणी केली तरी माझ्या बापाचं काही जाणार नाही पण त्यासाठी आधी बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल....

टीप:भक्तांनी कितीही वैयक्तिक टीका केली माझ्यावर तर त्यातून माझा आत्मविश्वास आणखी वाढेल पण मी ती पोस्ट डिलीट करणार नाहीच

(सदर पोस्ट महेश टिळेकर यांच्या फेसबूक वॉल वरुन घेण्यात आली आहे.)

Updated : 28 Nov 2020 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top