Home > Entertainment > Vanita Kharat: महाराष्ट्राची हस्या जत्रा अभिनेत्री वनिता खरातने तिचा वाढदिवस लास वेगासमध्ये साजरा केला.

Vanita Kharat: महाराष्ट्राची हस्या जत्रा अभिनेत्री वनिता खरातने तिचा वाढदिवस लास वेगासमध्ये साजरा केला.

Vanita Kharat: महाराष्ट्राची हस्या जत्रा अभिनेत्री वनिता खरातने तिचा वाढदिवस लास वेगासमध्ये साजरा केला.
X

महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडी टेलिव्हिजन शो सध्या चांगलाच गाजतोय.आपल्या कॉमेडीमुळे शोमधले सर्वच कलाकार महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झाले आहेत.स्यजत्रेतील कोळीवाड्याची रेखा म्हणुन ओळख असलेली वनिता खरात हिचा काहीच दिवसांपुर्वी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने वनिताने सोशल मिडीयावर पोस्ट केलीय.

कायमच आपल्या विनोदामुळे आणि काही पात्रांमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या वनिताने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर वनिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.वनिता खरात आपल्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणते, माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत... तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात ,

इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमित ने माझा हात धरला!"

पोस्टच्या शेवटच्या भागात वनिता खरात म्हणते, “या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. ता. क. - पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर I love you का ते तुम्हाला माहित आहे.”


Updated : 21 Aug 2023 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top