Home > Entertainment > आई वारल्यानंतर माधुरी दीक्षितची भावनिक पोस्ट..

आई वारल्यानंतर माधुरी दीक्षितची भावनिक पोस्ट..

आई वारल्यानंतर माधुरी दीक्षितची भावनिक पोस्ट..
X

अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेह लता दीक्षित (Snehalata Dixit’s death) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 12 मार्च रोजी दुपारी वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या आईची आठवण काढत माधुरी दीक्षितने सोमवारी एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली.

तिने लोकांना खूप काही दिले..

इंस्टाग्रामवर आई स्नेहलतासोबतचा एक फोटो शेअर करत माधुरीने लिहिले आहे, आज सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला माझ्या आईची खोली रिकामी दिसली. त्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. तिने अनेक लोकांना खूप काही दिले आहे. आम्हाला तिची खूप आठवण येईल, पण ती आमच्या आठवणीत नेहमीच जिवंत राहील. तिचे आशीर्वाद आणि कृपा सर्वांपर्यंत पोहोचली. आम्ही आमच्या आठवणींद्वारे आमचे जीवन एकत्र साजरे करू. ओम शांती.'


रविवारी आई स्नेह लता दीक्षित यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपट निर्माते सुभाष घई आणि इंद्र कुमार यांच्याव्यतिरिक्त काही जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. यावेळी स्मशानभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Updated : 15 March 2023 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top