Home > Entertainment > "घरातील व्यक्तीनेच मी १० वर्षांची असताना माझा विनयभंग केला"...ट्रान्सवुमन सायशा शिंदेचा खुलासा

"घरातील व्यक्तीनेच मी १० वर्षांची असताना माझा विनयभंग केला"...ट्रान्सवुमन सायशा शिंदेचा खुलासा

MX प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंगना रणौतचा लॉक अप शो सुरू आहे. त्या कार्यक्रमात ट्रान्सवुमन स्पर्धक सायशा शिंदे ने तिच्या आयुष्यातील एक काळं सत्य सांगितलं आहे.

घरातील व्यक्तीनेच मी १० वर्षांची असताना माझा विनयभंग केला...ट्रान्सवुमन सायशा शिंदेचा खुलासा
X

MX प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झालेला अभिनेत्री कंगना रणौतचा 'लॉक अप' शो सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक त्यांच्या भूतकाळातील चांगले आणि वाईट अनुभव एकमेकांसोबत सामायिक करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडे हिनं तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा खुलासा केला होता. निशा रावलने देखील तिच्या घटस्फोटाबाबत काही धक्कादायक गोष्टी या कार्यक्रमामध्ये सांगितल्या होत्या.

तर आता लिंगबदल करून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदे हिनंही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर उद्योजक तेहसीन पूनावाला याने सायशा शिंदेला एविक्शनपासून वाचवण्यासाठी एक डार्केस्ट सिक्रेट सांगण्याची अट घातली आणि या बदल्यात सायशाने ही तिचं एक गुपित सांगितलं.

सायशाने यावेळी खुलासा केल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. इतकंच काय तर कंगनाला ही याबाबत आश्चर्य वाटलं. सायशा १० वर्षांची असताना तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तिचा विनयभंग केला होता. या विषयी सांगताना सायशा म्हणाली, " मी १० वर्षांची होते तेव्हा माझ्या घरातील एका व्यक्तीने माझा विनयभंग केला होता. ती व्यक्ती माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकीच एक होती. शिवाय ती व्यक्ती माझ्याहून अगदी काहीच वर्षांनी मोठी होती. तेव्हा प्रश्न हा होता की ते काही वर्षांनी माझ्याहून मोठे आहेत, तर तो विनयभंग होता का? काही वर्षांनी मी मोठी झाले आणि मला तेव्हा जाणवलं की तो माझा विनयभंग होता."

Updated : 13 March 2022 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top