Home > Entertainment > केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची भेट कशी झाली पहा..

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची भेट कशी झाली पहा..

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची भेट कशी झाली पहा..
X

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज 23 जानेवारीला क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार आहे. खंडाळ्यात दोघांचे लग्न होणार असून, याला बॉलिवूड आणि देशातील बड्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. लग्नापूर्वी दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही आपलं नातं गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांची जवळीक कोणापासूनही लपून राहू शकली नाही.

दोघांच्या लोकेशवरुन त्यांच्यातील रिलेशनची माहिती सर्वांना झाली होती. दोघांचेही फोटो एकाच लोकेशनवरून येत राहतात, दोघेही व्हेकेशनमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. याआधी त्यांच्या प्रेमसंबंधांच्या फक्त अफवा होत्या, पण जेव्हा केएल राहुलने बीसीसीआयच्या कागदपत्रात जोडीदाराऐवजी अथिया शेट्टीचे नाव लिहिले तेव्हा त्यांच्या नात्याची पुष्टी झाली.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. संवाद सुरू झाला आणि दोघांची मैत्री झाली. एकत्र वेळ घालवताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही रिलेशनमध्ये प्रवेश केला. दोघेही नेहमीच चर्चेत असतात, पण असे असतानाही दोघांनीही आपले नाते गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिलेशनशिपमध्ये असूनही, दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो पोस्ट केले नाहीत. पण आता या दोघांचे लग्न होणार आहे...

Updated : 23 Jan 2023 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top