Home > Entertainment > Kiara Advani कियारा अडवाणी आणि आलियाचं कनेक्शन माहित आहे का ?

Kiara Advani कियारा अडवाणी आणि आलियाचं कनेक्शन माहित आहे का ?

kiara adwani's real name is aliya

Kiara Advani कियारा अडवाणी आणि आलियाचं कनेक्शन माहित आहे का ?
X

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (KiaraAdvani) आता कियारा मल्होत्रा (Mrs Malhotra) झाली आहे. तिनं बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (SidharthMalhotra) सोबत लग्न केलंय. मात्र, कियाराचं आणि आलियाचं कनेक्शन या निमित्तानं समोर आलंय.

२०१४ मध्ये 'फगली' चित्रपटातून कियारा अडवाणी ने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. बॉलीवूड आणि कियारा कुटुंबाचं नातं तसं जुनचं आहे. कियाराचं खरं नाव हे आलिया आहे. राजस्थानच्या सूर्यगढ (Suryagadh) पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थनं लग्नगाठ (KiaraSidharthwedding) बांधली आहे. या दोघांच्या लग्नासाठी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटिजने हजेरी लावली होती. ३० वर्षीय कियारा ला एक भाऊ आहे, जो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याचं नाव मिशाल (mishaal advani) आहे. मात्र, मिशाल हा वयाच्या १३ व्या वर्षांपासूनच संगीत क्षेत्राशी जोडला गेला आहे. तो एक उत्तम संगीतकार आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३८ वर्षीय सिद्धार्थ हा कियारापेक्षा ८ वर्षांनी मोठा आहे. 'शेरशाह' चित्रपटाच्या (shershaah) शूटिंग वेळी दोघांमध्ये जवळीक वाढली. कियाराचे वडील हे व्यावसायिक आहेत. तर आई जेनेवीव जाफरी ही शिक्षिका आहे. कधीकाळी कियाराने सुद्धा शिक्षिकेची नोकरी केली होती. कियाराचं सध्या नेटवर्थ सुमारे ३० कोटी असून ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रूपये फीस घेते.

Updated : 7 Feb 2023 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top