Home > Entertainment > चहलची पत्नी धनश्रीची पहिली करवा चौथ, पतीसाठी लिहिली पोस्ट; 'चांद छुपा' या गाण्यावर डान्सही केला

चहलची पत्नी धनश्रीची पहिली करवा चौथ, पतीसाठी लिहिली पोस्ट; 'चांद छुपा' या गाण्यावर डान्सही केला

चहलची पत्नी धनश्रीची पहिली करवा चौथ, पतीसाठी लिहिली पोस्ट; चांद छुपा या गाण्यावर डान्सही केला
X

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी आणि नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्मा (Dhanashree Verma) अनेकदा तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत असते. धनश्री एक अप्रतिम डान्सर आहे आणि ती अनेकदा तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. धनश्री अनेकदा स्टेडियममध्ये टीम इंडियासाठी चीअर करताना पाहायला मिळाली आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री यांचे गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी लग्न झाले होते आणि २४ ऑक्टोबर रोजी धनश्रीने तिचा पहिला करवा चौथ(Karwa Chauth 2021) साजरा केला. धनश्रीने सर्गीच्या समारंभासंदर्भात तिच्या पहिल्या करवा चौथवर एक स्पेशल पोस्ट केली होती.

धनश्री एक अतिशय अप्रतिम डान्सर आहे असून, करवा चौथवरही तिने तिच्या डान्सचा व्हिडिओ टाकला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तीनेलिहिले आहे, 'करवा चौथ स्पेशल.' व्हिडिओच्या माध्यमातून धनश्रीने सर्व महिलांना करवा चौथच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Updated : 25 Oct 2021 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top