Home > Entertainment > 3 Idiots Sequel येणार, पण Kareena Kapoor का भडकली?

3 Idiots Sequel येणार, पण Kareena Kapoor का भडकली?

3 Idiots Sequel येणार, पण Kareena Kapoor का भडकली?
X

अमीर खान आणि करीन म्हंटल की आपल्याला त्यांचा एक चित्रपट नक्की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे 3 इडियट्स.. आजही आपण हा चित्र पूर्वी किती वेळा देखील पहिला असेल तरी कंटाळवाणा वाटतं नाही. यातील प्रत्येक पत्रावर लोकांनी भरभरून प्रेम केलं.. आता या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा सुरु झाली आहे आणि यावरूनच करीन कपूर चांगलीच भडकली आहे.. ती इतकी भडकली आहे की तिने या संतापात एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..

करिनाने व्हिडिओ शेअर केला व म्हणाली..

या व्हिडिओमध्ये करीना आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलताना दिसली. या व्हिडीओमध्ये पत्रकार परिषदेत बसलेल्या तिन्ही कलाकारांचा फोटो दिसत असून त्यावर '3 इडियट्स' लिहिलेले आहे.

करीना म्हणते, 'या तिघांनी सुट्टीवर असताना पत्रकार परिषद घेतली होती. व्हायरल होत असलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ या तिघांनी आपल्या सर्वांपासून लपवून ठेवलेले रहस्य आहे. काहीतरी चूक आहे, आणि कृपया असे म्हणू नका की ते शर्मनच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे. हे लोक सिक्वेलची योजना आखत आहेत. पण माझ्याशिवाय कसे?

मला विश्वासच बसत नाही..

करीना पुढे म्हणते, 'आता मी बोमनला फोन करून तपासते की काय चालले आहे? हे तिढे नक्कीच सिक्वेल घेऊन येत आहेत. व्हिडिओ शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला विश्वासच बसत नाही की ते माझ्याशिवाय असे काही करू शकतील? बोमन इराणी, त्यांनी ते तुमच्यापासून लपवून ठेवले आहे का?

हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता..

3 इडियट्स 2009 मध्ये रिलीज झाला होता. विधू विनोद चोप्रा यांनी त्याची निर्मिती केली होती. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर 55 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात आमिर आणि करिनाची जोडी चांगलीच आवडली होती. आता 3 इडियट्सच्या सिक्वेलची बातमी आल्याने आमिर, आर माधवन, शर्मन आणि करीना यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


Updated : 25 March 2023 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top