Home > Entertainment > Zwigato कपिल शर्मा बनला डिलीव्हरी बॉय...

Zwigato कपिल शर्मा बनला डिलीव्हरी बॉय...

Zwigato कपिल शर्मा बनला डिलीव्हरी बॉय...
X

कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या विनोदावरून ओळखला जातो. त्यामुळे अनेक अभिनेत्री अभिनेते त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोला भेट देतात. कपिल शर्माचा शो हा जास्त टीआरपी मिळवणारा शो आहे. त्यामुळे कपिल शर्मा हा चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करत आलेला आहे.

कपिल शर्मा फक्त कॉमेडी करतो असं नाही तर त्याचा स्वतःचा अभिनय सुद्धा पाहण्याजोग आहे. याआधीही कपिल शर्मा ने त्याचे चित्रपट काढले होते ज्यामध्ये त्याने विनोदी भूमिका निभावल्या आहेत पण त्या चित्रपटांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही आणि त्याच्यातून कपिल शर्माचा हवा तसा फायदाही झाला नाही.

पण आता कपिल शर्मा चा नवीन चित्रपट येत आहे जो कदाचित हिट ठरेल असं म्हंटलं जात आहे .कारण हा चित्रपट सामान्य माणसाच्या आयुष्यावर अवलंबून आहे.आणि त्यात तो एका डिलिव्हरी बॉयचं काम करताना दिसत आहे.

आपल्या देशात अनेक होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आहेत.अनेक तरुण अश्या कंपनीत काम करतात.कोणी अर्धवेळ तर कोणी पूर्णवेळ हेच काम करतात.अर्ध्या तासाच्या आत ऑर्डर घरी पोहचवणे जिकरीचे असते .अशी काम करत असताना काय त्रास होतो ,हे या चित्रपटातून कपिल शर्माने दाखवून दिले आहे .

कपिलचे याआधीचे चित्रपट कोणते?

किस किसको प्यार करूं 2015

फिरंगी 2017

Zwigato 2022

Updated : 2 March 2023 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top