Home > Entertainment > Kanjoos Makhichoos टूथपेस्ट संपली की तुम्ही काय करता?ही आयडिया कोण कोण वापरतं ?

Kanjoos Makhichoos टूथपेस्ट संपली की तुम्ही काय करता?ही आयडिया कोण कोण वापरतं ?

Kanjoos Makhichoos टूथपेस्ट संपली की तुम्ही काय करता?ही आयडिया कोण कोण वापरतं ?
X

सामान्य माणूस घरातील प्रत्येक गोष्ट कशी पुरवून वापरतो याची अनेक उदाहरणे दिली जातात ,पण याच माणसांना आपण कंजूस म्हणतो आणि अशाच आशयाचा सिनेमा "कुणाल केमू आणि श्वेता शर्मा"या दोघांचा येत आहे. कंजूस मक्खीचूस(Kanjoos Makhichoos ) हा सिनेमा धमाल करेल आणि प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात घर करेल असाच असणार आहे ,असे नुकताच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरवरून कळत आहे .

हा सिनेमा विपुल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे . यामध्ये जमनाप्रसाद पांडे म्हणून कुणाल घेऊन मुख्य भूमिकेत आहे. आणि त्याच्या पत्नीची भूमिका श्वेता त्रिपाठी शर्मा हिने साकारली आहे . या सिनेमात तिचं माधुरी असं नाव आहे . कुणाल केमुच्या आई वडिलांची भूमिका पियुष मिश्रा आणि अलका अमीन या दोघांनी साकारली आहे.

या चित्रपटाचा सारांश या ट्रेलर मधून दिसत आहे . जमनाप्रसाद पांडे मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे . जो प्रत्येक गोष्ट विचार करून करत असतो आणि आई-वडिलांनी तीर्थयात्रेला जाता यावं यासाठी पैसेही जमा करतो . पण या यात्रेदरम्यान अपघातात आई-वडील दोघेही जगाचा निरोप घेतात आणि सरकारकडून 14 लाखाची रक्कम आई-वडिलांना मिळणार असते आणि त्यामध्ये भ्रष्टाचार निर्माण होतो . त्या विरोधात एक मध्यमवर्गीय व्यक्ती म्हणजेच जमनाप्रसाद पांडे कशी लढाई देतो हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

अनेक सामान्य माणसांच्या घरात घडणाऱ्या गोष्टी या चित्रपटात कैद करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच अवघ्या काही तासात या ट्रेलरला चांगल्या विव्हज आल्या आहेत.

Updated : 14 March 2023 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top