Home > Entertainment > कंगना आणि दिलजीतमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता..

कंगना आणि दिलजीतमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता..

कंगना आणि दिलजीतमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता..
X

सोशल मीडियावर कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉर संपण्याचं नावच घेत नाहीये. तसा दोघांच्यात सुरू झालेल्या वादा अनेक दिवस लोटले असले तरी दोघांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. कंगनाने आता पुन्हा एकदा डिवचलं आहे.

कंगनाने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यामातून तिने प्रियांका आणि दिलजीतला कृषी विधेयक समजावण्याचा प्रयत्न केला आहे. "प्रिय दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा जर तुम्हाला खरच शेतकऱ्यांची चिंता आहे आणि तुम्ही खरच आपल्या मातांचा आदरसन्मान करत असाल तर कृषी कायदा काय आहे ऐकून घ्या! की तुम्ही फक्त आपल्या मातांचा, बहिणींचा आणि शेकऱ्यांचा वापर करुन देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचा विचार करत आहात का? वाह रे दुनिया वाह…" अशा आशयचे ट्विट कंगनाने प्रश्नि विचारला आहे.

दरम्यान जी कंगना आता दिलजीतला हे कृषी विधेयक पंजाबीमध्ये समवाजून सांगण्यास सांगत आहे. काही दिवसांपूर्वी दिलजीतचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात त्याने कंगनाला टोला मारत म्हटले होते की, मी हिंदीत बोलत आहे जेणेकरून सर्वांना समजेल. "


Updated : 11 Dec 2020 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top