“हे कुठून येतात? उंदरासारखे घुसतात!”
जया बच्चन यांचा पापराझींवर पुन्हा संताप
X
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेत आल्या आहेत. कारणही तसंच — पापराझींवरील त्यांचा तुफान राग! त्या अनेकदा आपला राग व्यक्त करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहतो.
मुंबईतल्या ‘वी द विमेन’ या कार्यक्रमात बरखा दत्त यांना मुलाखत देताना जया बच्चन “माझे मिडियाशी संबंध चांगले असले तरी माझं पापराझींशी नात 0 आहे” असे म्हणाल्या. “फोन हातात असल्यावर कधीही फोटो काढू शकतात, काहीही बोलू शकतात असं त्यांना वाटत.” अशी टीकाही त्यांनी पापराझींवरती केली.
फोटोग्राफर्सनी सेलेब्रिटींना घेरून फोटो काढण्यावर जया बच्चन यांनी नेहमीच्या शैलीतच जरा कडक भाषेत सुनावलं.
त्या म्हणाल्या,
“हे लोक घाणेरड्या ड्रेन पाईप पँट घालतात उंदीरासारखे घुसतात. कोण आहेत हे? काय शिक्षण आहे यांच? कोण शिकवतं यांना?” जया बच्चन यांनी पुढे पापाराझींच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “मर्यादा कुठे आहेत? कोणाच्याही आयुष्यात असं घुसणं योग्य आहे का?” असा त्यांचा प्रश्न होता.
जया बच्चन यांनी सांगितले की त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील एका सदस्याने एकदा त्यांना सोशल मीडियावर मिळणाऱ्या निगेटिव्ह कमेंटबद्दल सांगितले होते. जया म्हणाल्या, "हे खूप मजेशीर आहे. दिल्लीतील माझ्या एका स्टाफने सांगितले की ती कोणतेही सोशल नेटवर्क वापरत नाही कारण सोशल मीडियावर सर्वात जास्त द्वेष मलाच मिळतो. मी म्हणाले, मला काही फरक पडत नाही. तुम्ही माझा द्वेष करता, हे तुमचे मत आहे. मलाही तुम्ही आवडत नाही.
यावेळी त्यांनी आजच्या तरुण कलाकारांनाही टोला लगावला.
त्या म्हणाल्या,
“मी सोशल मिडियावर नाही. त्यामुळे मी एअरपोर्टवर पापराझींना बोलवणाऱ्या सेलेब्रिटींना ओळखत नाही. फोटो काढण्यासाठी स्वतःच कॅमेरे बोलवायला लागत असतील तर मग तुम्ही कसले सेलिब्रिटी?”
जया बच्चन यांचं पापाराझींशी equation आधीपासूनच बिघडलेलं आहे. त्या कॅमेऱ्याच्या अवतीभोवतीचा गोंधळ, ओरड, अचानक केलेलं शूट यावर नेहमीच नाराज राहिल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील त्यांचं हे विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.. याला लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.






