Home > Entertainment > जपानी ॲम्बेसेडॉरचा रजनीकांत स्टाइल डान्स, पण काय वाटतं तुम्हीच सांगा राव...

जपानी ॲम्बेसेडॉरचा रजनीकांत स्टाइल डान्स, पण काय वाटतं तुम्हीच सांगा राव...

जपानी ॲम्बेसेडॉरचा रजनीकांत स्टाइल डान्स, पण काय वाटतं तुम्हीच सांगा राव...
X

'रजनीकांत' फिल्म इंडस्ट्रीत हे नाव म्हणजे एक वादळ आहे. रजनीकांत या नावाने लाखो-करोडो रसिकांच्या मनात घर केले आहे. रजनीकांत आणि त्यांचे फॅन्स याविषयी न बोललेलंच बरं.., त्यांच्यासाठी कोणी काय काय करेल याचा काही नेम नाही. सर्वात अजब गजब असे फॅन रजनीकांत यांचेच असू शकतात आहो असू शकतात काय आहेतच म्हणा... आता जो एक व्हिडिओ समोर आलाय त्यावरून तुम्हाला रजनीकांतची क्रेझ काय आहे हे समजेल. जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी यांनी सुद्धा रजनीकांतच्या गाण्यावर ठेका धरला आहे..

तर विषय असा आहे सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये जपानचे राजदूत आणि एक प्रसिद्ध youtube वर डान्स करत आहेत. जपानच्या राजदूतांना एका भारतीय गाण्याने भुरळ पाडली आणि त्यावर डान्स करण्याचा त्यांचा मोह आवरलेला दिसत नाही. मग काय त्यात दोघांनी मिळून चांगलेच ठुमके लगावले आहेत. जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांचा डान्स व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये ते सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. 17 सेकंदांच्या नृत्याचा व्हिडिओ राजदूत हिरोशी सुझुकी यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी यूट्यूबर मायो सॅन हिरोशी सुझुकीसोबत ते डान्स करत आहेत. एवढेच नाही या डान्स मध्ये त्यांनी रजनीकांची स्टाईल देखील कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यात ते खरंच जमलं आहे की नाही हे तुम्हीच सांगा. रजनीकांतची स्टाईल करणं इतकं सोप आहे का? आणि त्यांनी केलेली स्टाईल रजनीकांत सारखी वाटते का? कमेंट बॉक्समध्ये लगेच कळवा...

Updated : 17 Aug 2023 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top