Home > Entertainment > जेमी लीव्हरची भारतातील पहिली वन-वुमन शोची घोषणा: 'द जेमी लीव्हर शो'!

जेमी लीव्हरची भारतातील पहिली वन-वुमन शोची घोषणा: 'द जेमी लीव्हर शो'!

जेमी लीव्हरची भारतातील पहिली वन-वुमन शोची घोषणा: द जेमी लीव्हर शो!
X

प्रसिद्ध आणि अष्टपैलू विनोदी कलाकार आणि अभिनेत्री, जेमी लीव्हर, भारतातील पहिल्या वन-वुमन शो - 'द जेमी लीव्हर शो' मध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा हिंदी स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रम प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देईल. यात जेमी तिच्या विनोदाची सर्व रंगत दाखवणार आहे - तिची अद्वितीय निरीक्षणे, हुबेहुब नक्कल आणि तिच्या स्टँड-अप सेटमध्ये सहजपणे मिसळलेले गायन आणि नृत्य कौशल्य तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळी झलक पाहायला मिळणार आहे.




भारतातील पहिले मूळ स्टँड-अप कॉमेडियन जॉनी लीव्हर यांच्या प्रतिभावान वारसदार, जेमीने कॉमेडी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ स्टँड-अप कॉमेडी करत आहे. यापूर्वी 'जॉनी लीव्हर लाइव्ह'चा अविभाज्य भाग म्हणून जगभरात प्रवास करत तिने 250 हून अधिक शो केले आहेत. 17-18 फेब्रुवारीला मुंबईत दोन शो आयोजित केले जातील - एक नेहरू सेंटरमध्ये आणि दुसरा ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात.




आगामी दौऱ्याबद्दल उत्साह व्यक्त करताना जेमी लीव्हर म्हणते, "'द जेमी लीव्हर शो' हा माझ्या विनोदी आणि कलात्मक क्षमतेचा एक अविभाज्य भाग आहे. यात विनोद, नक्कल आणि मनोरंजनाचा एक अनोखा मेळ आहे. प्रेक्षकांना माझ्या जगाची झलक पाहायला मिळेल. मला माझ्या गावी, मुंबईत हा वन-वुमन शो सादर करताना खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांशी अधिक जवळून जोडण्यासाठी मी उत्सुक आहे."

हा दौरा जेमीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण हा तिच्या मूळ शहरात, मुंबईत होणारा पहिला वन वुमन शो उपक्रम आहे. नेहरू सभागृह, मुंबई आणि ठाण्यातील काशिनाथ घाणेकर हॉल ही निवडक ठिकाणे निवडली गेली आहेत. पोटधारून हसण्यासाठी आणि मनोरंजन यासाठी प्रेक्षकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली जेमी लीव्हर आणि तिचा 'द जेमी लीव्हर शो' भारतातील स्टँड-अप कॉमेडीसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करेल अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांना एका मनोरंजक आणि गुंतवून ठेवणाऱ्या अनुभवाची अपेक्षा आहे, ज्यामुळे हा शो विनोदप्रेमींसाठी नक्कीच पाहण्यासारखा बनेल.

Updated : 5 Feb 2024 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top