Home > Entertainment > South movies चा प्रभाव मराठी चित्रपटांवर दिसतोय का?

South movies चा प्रभाव मराठी चित्रपटांवर दिसतोय का?

South movies चा प्रभाव मराठी चित्रपटांवर दिसतोय का?
X

मराठी चित्रपट हे खास करून अभिनयासाठी ओळखले जातात.अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिनेते त्यांच्या अभिनयाने प्रसिद्धीस आले आहेत.दादासाहेब फाळके ज्यांनी या चित्रपटसृष्टीला जन्म दिला त्यांचे योगदान अमूल्य आहे. मुकपटापासून सुरू झालेली ही कहाणी ऑस्कर पर्यंत पोहचली.पण दाक्षिणात्य सिनेमाने बाजी मारलेली दिसते.

अनेक मराठी सिनेमे हे त्यातील अभिनयाने गाजलेले आपण पाहिले आहेत.पण हल्ली नव्याने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची झलक पाहिली तरी कळतं की थोडा का होईना साऊथ सिनेमांचा फील हे चित्रपट देऊन जातात."घर ,बंदूक, बिर्याणी "हा नागराज मंजुळे यांचा नवा सिनेमा येतोय, यामधील संगीत ,कलाकारांची वेशभूषा पासून ते नायक आणि खलनायकांची एन्ट्री हुबेहूब दाक्षिणात्य चित्रपटांची आठवण करून देते.

" स्कुल,कॉलेज आणि लाईफ "हा सुद्धा नवीन चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .प्रिया प्रकाश ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे ."रूपा नगर के चिते"मधला नायक या चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे.मराठी चित्रपटसृष्टीत नवे चेहरे आता पाहायला मिळत आहेत .त्याबरोबरच प्रेमकहाणी दाखवताना दाक्षिणात्य सिनेमांप्रमाणे अतूट प्रेमाचे दाखले सुद्धा दाखवले जात आहेत.

काही सिनेमा अपवाद नक्कीच असू शकतात. आणि ज्या वेगाने दाक्षिणात्य सिनेमांची आवड निर्माण होतेय त्यापद्धतीने चित्रपट सृष्टीत बदल होणं स्वाभाविक आहे.पण यामुळे मराठी चित्रपटाचा मूळ गाभा म्हणजेच अभिनय कुठे हरवू नये इतकंच....

Updated : 22 March 2023 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top