Home > Entertainment > पन्नाशी नंतर दुसऱ्या लग्नाचा विचार करणं सोपं असतं का?

पन्नाशी नंतर दुसऱ्या लग्नाचा विचार करणं सोपं असतं का?

पन्नाशी नंतर दुसऱ्या लग्नाचा विचार करणं सोपं असतं का?
X

अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वर्षभरापूर्वी त्याची पहिली पत्नी अभिनेत्री पीलू विद्यार्थी उर्फ ​​राजेशी बरुआ हिच्यापासून घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. आता अलीकडेच

त्यांनी फॅशन डिझायनर रुपाली बरुआसोबत लग्न केले आहे. आशिष यांनी एका मुलाखतीत रुपालीला कसे आणि कधी भेटले हे सांगितले. यासोबत त्याने रुपालीशी लग्न करण्याच्या आपल्या निर्णयाने त्याच्या कुटुंबात कसे दुःख झाले हेही सांगितले. वयाच्या ५७ व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांचे दुसरं लग्न आणि त्याचा त्यांचावर कसा परिणाम झाला. हा निर्णय दोघांसाठी इतका सोपा होता का? या सगळ्याविषयी आशिष विद्यार्थी यांनी काय म्हंटल आहे पाहुयात...

रुपालीला ब्लॉगिंग असाइनमेंट दरम्यान भेटले..

द टेलिग्राफ T2 ला दिलेल्या मुलाखतीत आशिषने रुपालीला कधी आणि कसे भेटले हे सांगितले. आशिष म्हणतात की, 'पीलूसोबत सर्व काही संपल्यानंतर मी गेल्या वर्षी माझ्या एका ब्लॉगिंग असाइनमेंट दरम्यान रुपालीला भेटलो. रुपालीने पाच वर्षांपूर्वी तिचा नवरा गमावला होता आणि तिने पुन्हा लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. पण जसजसे आम्ही एकमेकांशी बोलत होतो, तसतसे तो आम्ही लग्नाचा विचार करू लागलो. ती 50 वर्षांची आहे आणि मी 57 वर्षांची आहे आणि आम्ही दोघे एकत्र आनंदी राहू शकतो हे आम्हाला हळू हळू समजत गेले व आम्ही निर्णय घेतला..

आमच्या कुटुंबासाठी हा एक कठीण निर्णय होता...

आशिष यांनी सांगितले की, या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप दुःख झाले. तो म्हणाला, 'पीलू आणि माझ्या लग्नाच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. मी पीलूला फक्त माझ्या मुलाची आई म्हणून पाहत नाही. ती माझी मैत्रीण आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी वेदनारहितपणे त्याच्यापासून वेगळे झालो, तर तसे नाही. हे फक्त माझ्यासाठीच नाही तर पीलू आणि आमच्या मुलासाठीही खूप कठीण होतं. पण मग तुम्हाला वेदनांसह जगायचे आहे की त्यातून पुढे जायचे आहे हे ठरवायचे आहे.

दोन व्यक्ती सुंदर राहण्याठी सुद्धा वेगळे होऊ शकतात...

यापूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पीलूने आशिषच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, 'लोकांना एकाच स्टिरियोटाइपने बांधले आहे की जेव्हा दोन लोक वेगळे होतात तेव्हा दोघांमध्ये फक्त भांडणे आणि शिवीगाळ होते. कधी कधी दोन लोक अगदी शांतपणे आणि सुंदर जगण्यासाठी वेगळे होतात.

बाकी तुम्हाला काय वाटतं प्रेमाला वयाचे बंधन असलं पाहिजे? की प्रेम असंच वय, रंग रूप हे न बघता केलं पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

Updated : 1 Jun 2023 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top