Home > Entertainment > मिताली राजचा जीवनपट शाब्बास मित्थू चा ट्रेलर प्रदर्शित

मिताली राजचा जीवनपट शाब्बास मित्थू चा ट्रेलर प्रदर्शित

मिताली राजचा जीवनपट शाब्बास मित्थू चा ट्रेलर प्रदर्शित
X

नुकतीच जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर युट्युब वर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाब्बास मित्थू असे या चित्रपटाचे नाव असून प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

सुप्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ज्याप्रमाणे एकेकाळी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे दिसतं सचिन तेंडुलकरच्या खांद्यांवर असायची त्याचप्रमाणे महिला क्रिकेट संघाची संपूर्ण जबाबदारी मिताली राज स्वतःच्या खांद्यांवर पेलली. तिच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक किर्तीमान कायम केले. ज्यामध्ये 232 एकदिवसीय सर्वाधिक 7805 धावांचा विश्वविक्रम केला आहे. शिवाय महिला कसोटी क्रिकेटमध्ये तिने 214 धावांची सर्वोच्च खेळी देखील केली आहे. असे एक ना अनेक विक्रम नावावर असलेल्या मितालीचा जीवनपट येत्या 15 जुलै 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अत्यल्प कालावधीत ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेत्री तापसी पन्नू ही या चित्रपटात मितालीची मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम18 स्टुडिओ ने केली आहे. तर दिग्दर्शन श्रीजित मुखर्जी यांनी केलं आहे. तर या चित्रपटात तापसी पन्नू सह अभिनेते विजयराज यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे या सिनेमाचा संगीत अमित त्रिवेदी यांचं असून गीतकार स्वानंद किरकिरे आहेत.

Updated : 20 Jun 2022 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top