Home > Entertainment > हॉट इतनी की उफ्फ ! कविता कौशिक चा अफलातून रिप्लाय

हॉट इतनी की उफ्फ ! कविता कौशिक चा अफलातून रिप्लाय

हॉट इतनी की उफ्फ ! कविता कौशिक चा अफलातून रिप्लाय
X

छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर असो प्रत्येक कलाकाराला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. क्षुल्लक गोष्टींमुळे चाहते अनेकदा कलाकारांना त्रास देतात. कधीकधी ट्रोल इतकं करतात कि मर्यादेपलिकडे जातात. सोशल मीडियाचा वापर करून कलाकारांना ऐकू इच्छित नसलेल्या गोष्टी बोलतात, अनेकदा बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अगदी त्यांच्याशी गैरवर्तनहि करतात. काही अभिनेते ट्रोल्सकडे दुर्लक्ष करतात तर काहीजण त्याचं उत्तर देतात.

असाच काहीसा प्रकार "एफआयआर" मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिक हिच्या सोबत घडला. तिलाही तिच्या होळीच्या फोटो मुळे ट्रोलिंग ला सामोरे जावे लागले. यंदाच्या होळी मध्ये कविता हिने पाण्याने भिजलेला, बिन्दास्त फोटो ट्विटर वर पोस्ट केला आणि ट्विट मध्ये असं लिहिलं होतं कि "छुपा लो अपनी तमीजदार हम तो राउडी होली खेलते है" अस ट्विट केले.

पूनम बाली हिने कविता कौशिक हिच्या फोटोला ट्रोल करत "कुरुप 41 वर्षांची महिला" असे ट्विट केले.

लीना हिने पूनम बाली हिला रिप्लाय देत ट्विट केलं कि "कुरूप शब्द योग्य आहे. तिला वाटते की ती एक सौंदर्य स्पर्धा विजेती आहे"

या सगळ्या ट्विटला हॉट इतनी की उफ्फ ! कविता कौशिक हिने अफलातून रिप्लाय दिला आणि लिहिले कि. 42!!!! और मैं खूबसूरत हूँ! और हॉट इतनी हू की उफ्फ्फ!!! सॉरी आपको आपके घरवाले पालने में दाल के भूल गए ! a huge hug for you, मुझे यकीन है कि आप अच्छे हैं बस प्यारे नही.

जिथे महिलांचा सन्मान केला पाहिजे तिथे महिलाच महिलेला कुठे तरी पाठी खेचत आहे. प्रत्येक स्त्री हि सुंदरच असते. सौंदर्याची परिभाषा सुंदर दिसण्याने येतच नाही येतच नाही कारण सुंदरता हि चेहऱ्यावरून नाही तर स्वभावाने दिसते. अनेकदा आपण काळा, गोरा, जास्त वयाचा किंवा वजनावरून एकमेकांना बोलतच असतोच. हे ट्रोलिंग फक्त कलाकारांसोबतच नाही तर सगळ्याच्या सोबत होत.

अश्या बोलण्याने वाईट न वाटून घेता कवीता हिने सडेतोड उत्तर दिले आहे. तसाच कविता कौशिक हिला अनेक ट्विट वापरकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि तिच्या पोस्ट ला लाईक आणि कंमेंट्स च्या माध्यमातून प्रेम दिले.

Updated : 9 March 2023 12:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top