Home > Entertainment > हिना खानने हेमा मालिनी यांच्या 'क्या खूब लगती हो' गाण्यावर केला डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हिना खानने हेमा मालिनी यांच्या 'क्या खूब लगती हो' गाण्यावर केला डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हिना खानने हेमा मालिनी यांच्या क्या खूब लगती हो गाण्यावर केला डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हालाही   वाटेल आश्चर्य
X

'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये काम केल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री हिना खानची लोकप्रियता प्रचंड आहे. या मालिकेत तिला 'अक्षरा' नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यात हिना खान सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आली आहे. तिचे फोटोशूट आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकताच हिना खानने एका जुन्या गाण्यावर डान्स करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गाजलेल्या 'क्या खूब लगती हो' गाण्यावर हिना डान्स करताना दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गोल्डन कलरच्या सूटमध्ये हिना खूपच सुंदर दिसत असून,तिचा लुकही जबरदस्त दिसत आहे. त्यामुळे तिचा हा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

हिना खानने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात टीव्हीच्या प्रसिद्ध सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' पासून सुरवात केली होती. त्यानंतर ती बर्‍याच मोठ्या मालिकांमध्ये दिसली. यासोबतच सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खानसमवेत हिना खान बिग बॉस-14 मध्ये ज्येष्ठ म्हणूनही दिसली. नुकतेच तिचा 'बारीश बन जाना' हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच पसंत केली जात आहे

Updated : 17 July 2021 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top