Home > Entertainment > ' Hera Pheri 3 ' चित्रपटातील सस्पेन्स झाला लीक..

' Hera Pheri 3 ' चित्रपटातील सस्पेन्स झाला लीक..

 Hera Pheri 3  चित्रपटातील सस्पेन्स झाला लीक..
X

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट 'हेरा फेरी 3' ची शूटिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अनेक दिवसांपासून चाहते मागणी करत होते. आता विशेष बाब म्हणजे अक्षय कुमारही या चित्रपटाचा एक भाग आहे. चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा एकत्र फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिन्ही कलाकार चित्रपटातील त्यांच्या पात्राच्या गेटअपमध्ये दिसत आहेत.

लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत

आता हा फोटो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विशेषत: अक्षय कुमारला पाहून लोक खुश झाले आहेत आणि चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिथे एकाने कमेंट करत लिहिले की, 'अक्षय कुमारच्या आगमनाने चित्रपटाला चार चाँद लागले आहेत.' तर दुसरा म्हणाला, 'हा एक आयकॉनिक चित्रपट असणार आहे.'

चाहते अक्षयला चित्रपट साइन करण्याची विनंती करत होते

खरंतर काही काळापूर्वी अक्षय कुमारने या फ्रँचायझीमधून बाहेर पडल्याचे बोलले जात होते. इतकंच नाही तर चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवालासोबतच्या त्याच्या मतभेदाचीही चर्चा रंगली होती. त्याचवेळी, काही महिन्यांपूर्वी अक्षयने एका मुलाखतीत असेही सांगितले होते की, त्याला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही, त्यामुळे तो या चित्रपटाचा भाग नाही. असे असतानाही चाहते त्याला 'हेरा फेरी 3' साइन करण्यासाठी सतत विनंती करत होते.

चित्रपटाचा पहिला भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता.

'हेरा फेरी' हा बॉलिवूडमधील सदाबहार चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रियदर्शनने दिग्दर्शित केला होता. मागील दोन भागांमध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. दोन्ही भाग प्रेक्षकांमध्ये आजही तितकेच लोकप्रिय आहेत जितके ते तेव्हा होते. या चित्रपटाचा पहिला भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Updated : 23 Feb 2023 7:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top