Home > Entertainment > "बाई ,बुब्स आणि ब्रा" या पोस्टमुळे ट्रोल झालेली हेमांगी कवी मानतेय ट्रोलर्सचे आभार

"बाई ,बुब्स आणि ब्रा" या पोस्टमुळे ट्रोल झालेली हेमांगी कवी मानतेय ट्रोलर्सचे आभार

बाई ,बुब्स आणि ब्रा या पोस्टमुळे ट्रोल झालेली हेमांगी कवी मानतेय ट्रोलर्सचे आभार
X

अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ तीच्या बोल बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चे चा विषय बनली आहे. हेमागी कवी ही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. बाई, बुब्स आणि ब्रा ही पोस्ट खुप वादग्रस्त ठरली होती त्यावेळी हेमांगीला समाजमाध्यमांतून मोठ्याप्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तर काहीने तीच्या या बिनधास्त बोलण्याबाबत कौतुक देखील केले होते. हेमांगी कवी ह्या त्यांच्या चित्रपटासह खासगी गोष्टी ही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र त्यांच्या या काही सोशल मिडीया पोस्टमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करवा लागतो. परंतु हेमांगी कवीने एका मुलाखतीत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेमांगीच्या या बिनधास्त वक्तव्यातमुळे काही लोक तिला ट्रोल करतात, तर काही लोकं तीला समर्थन देत असतात. नुकतंच तिला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हेमांगी म्हणाली कि.. "मला लोक हिणवतात, ट्रोल करतात. याचा मी सुरुवातीला फार विचार करायचे. पण आता मी त्याला महत्त्व देत नाही. ट्रोल करणाऱ्या लोकांपासून वाचावं म्हणून मी माझं अकाऊंट कधी बंदही केलं नाही आणि कमेंट डिलीटही केलेल्या नाहीत." याउलट ट्रोलर्समुळे माझ्या पोस्ट चर्चेत आल्या. यामुळे अनेक तरुण मुलं-मुली माझ्याशी जोडल्या गेल्या. आणि त्यामुळेच माझ्याशी मनमोकळा संवाद साधतात. आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. त्या संबंधित मुद्द्यावर प्रत्येकाने मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे हेमांगीने तीच्या ट्रोलर्सचे मनापासून आभार मानलें आणि त्यांनीच मला मोठं केलं आहे" अशी प्रतिक्रीया देखील त्यांनी या मुलाखतीत दिली.वो

Updated : 3 Aug 2022 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top