कोरोनामुळे संपुर्ण जग हैराण आहे. याच्या आणखी किती लाटा येतील हे देखील माहिती नाही. हा विषाणू देखील हलका नाही प्रत्येक लाटेत 'मॉडीफाय' होतो. या सगळ्या पॅनीक वातावरणात नेते मंडळी मात्र शास्त्रज्ञांनाही पागल करुन सोडणारे घरगुती उपाय सांगून मनोरंजन करत आहेत. यात भाजप खासदार हेमा मालिनी देखील मागे नाहीत.
अभिनेत्री आणि मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांचा दावा आहे की, 'तूप, कडूलिंबाची पानं आणि अत्तराने हवन केल्यामुळे कोरोनासारख्या साथीचा आजार टाळता येतो. त्याच बरोबर हवन सकाळ संध्याकाळ दोन वेळा केल्याने कौटूंबीक वाद देखील होतं नाहीत.'
जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त हेमा मालिनी यांनी मुंबईतील घरात हवन केलं. त्यांनी सांगीतलं की, "मागील एक वर्षापासून मी हवन करत आहे. याच्यामुळे वातावरण शुध्द राहतं. यात राई आणि अत्तर असल्याने ते रोग टाळण्यास मदत करते. तुम्हीही रोज हवन करा"
देशात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्या जरी कोराना संक्रमीत लोकांची संख्या कमी होत असली तरी, काळ्या बुरशी आणि म्यूकरमायकोसीसमुळे लोकं त्रस्त आहेत. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लसीकरण करणे हाच एक महत्वाचा उपाय आपल्याकडे आहे.