Home > Entertainment > OMG 2 मधील हर हर महादेव गाणे रिलीज...

OMG 2 मधील हर हर महादेव गाणे रिलीज...

OMG 2 मधील हर हर महादेव गाणे रिलीज...
X

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांचा बहुचर्चित चित्रपट 'OMG 2' चे दुसरे गाणे हर हर महादेव रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षय कपाळावर भस्म लावून शिव तांडव करताना दिसत आहे. याआधी 'ऊंची ऊंची वादी' या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले होते.

गाण्यात अक्षयने स्वत:ला भोलेनाथच्या रूपात साकारण्याचा प्रयत्न केला आहे. लांब केस आणि चेहऱ्यावर राख असलेला लूकमध्ये अक्षय कुमार दिसत आहे. हर हर महादेव या गाण्याच्या सुरुवातीला अक्षय सिंहासनावर बसलेला आहे आणि त्याच्याभोवती शिवभक्त दिसत आहेत, सर्वजण भोलेनाथाच्या भक्तीत हरवले आहेत.

या आधी या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता OMG 2 च्या निर्मात्यांनी 27 जुलै रोजी हर हर महादेव या चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला आहे...

Updated : 27 July 2023 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top