Home > Entertainment > Gumraah मृणाल ठाकूर आता पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत

Gumraah मृणाल ठाकूर आता पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत

Gumraah मृणाल ठाकूर आता पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत
X

बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेत्री पोलिसांच्या भूमिकेत आपल्याला दिसतात यामध्ये तब्बूला नेहमीच पसंती दिली जाते .शक्यतो अनेक अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभवतात. पण त्यापैकी काहीच अभिनेत्रींना या भूमिकेतून ओळख मिळते.
मृणाल ठाकूर ही अभिनेत्री महाराष्ट्रीयन आहे. धुळे जिल्ह्यातील मृणाल आता बॉलीवूडमधील टॉपचीअभिनेत्री आहे .मृणाल हिंदी सोबत मराठी तर बोलतेच पण खानदेशी भाषा सुद्धा अगदी सहज बोलते .मृणाल ने स्टार प्लस वरील खामोशिया मालिकेमधून अभिनयाची सुरुवात केली होती. त्याचबरोबर रंगकर्मी, हॅलो नंदन ,सुराज्य, विटी दांडू या चित्रपटात सुद्धा ती दिसली आहे .सध्या गुमराह या चित्रपटात आदित्य राय कपूर सोबत एका पोलिस ऑफिसर ची भूमिका निभावत आहे .


या चित्रपटाचा ट्रेलर एका दिवसात 7.7 मिलियन लोकांपर्यंत पोहोचला आहे .हा चित्रपट एका दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे.आदित्य रॉय कपूर याच्या भूमिकेमुळे सुद्धा प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केला आहे .पण मृणाल ठाकूरचा हा नवीन लुक सध्या चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूर हा एक आरोपी दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये आदित्य रॉय कपूर तसेच मृणाल ठाकूर यांच्या अभिनयाची जादू चाललेली दिसतं आहे.

येत्या काळात पाहावं लागेल की ,मृणाल आपल्या नव्या भूमिकेमुळे चाहत्यांच्या मनावर अधिक प्रभाव निर्माण करेल का?तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Updated : 25 March 2023 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top