Home > Entertainment > इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर तुझ्या स्तनांची सर्जरी कर, राधिका आपटेने केला गौप्यस्फोट

इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर तुझ्या स्तनांची सर्जरी कर, राधिका आपटेने केला गौप्यस्फोट

इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर तुझ्या स्तनांची सर्जरी कर, राधिका आपटेने केला गौप्यस्फोट
X

सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडवर कायम घराणेशाहीचे आरोप केले जातायत. इतकंच काय तर अनेक बड्या अभिनेत्यांचे चित्रपट पडद्यावर सपशेल आपटले. त्या आधी आलेल्या #metoo मोहिमेमुळे देखील चित्रपटसृष्टीत महिलांचं शोषण केलं जात असल्याचे आरोप देखील झाले. अशाच आरोपांना बळ देणारा धक्कादायक खुलासा एका बड्या मराठी अभिनेत्रीने केला आहे.

सुप्रसिध्द अभिनेत्री राधिका आपटे हिने फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःचा डंका वाजवला आहे. चित्रपट असोत किंवा वेबसिरीज तिने यशस्वीपणे तिची ओळख निर्माण केली आहे. तिच्या काही चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे ती बऱ्याचदा चर्चेचा विषयही ठरली आहे. बहुतेकवेळा यावरुन तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं आहे. राधिका ही सध्या सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र सिनेसृष्टीत येणाऱ्यासाठी तिला फार मोठा संघर्ष देखील करावा लागला आहे. नुकतंच राधिकाने एका मुलाखतीदरम्यान सिनेसृष्टीतील तिच्याबद्दलचं एक विदारक सत्य सांगितले आहे.

काही काळापुर्वी राधिकाला एका विचित्र प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं. तिला काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी विचित्र कारणं देत बऱ्याच चित्रपटातून बाहेर काढलं गेलं होतं. "काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नकार दिला गेला. याचं कारण फार विचित्र होतं. अनेकदा माझी तुलना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत केली गेली", अस राधिका ने त्या मुलाखतीत सांगितलं.

"तुझ्या तुलनेत त्या अभिनेत्रींचे ओठ आणि छाती ही अधिक चांगली आहे. त्या तुझ्यापेक्षा जास्त आकर्षक दिसतात आणि त्या फार काळ टिकतील", असंदेखील सांगण्यात आल्याचं राधिका म्हणाली.

"हा एक चांगला चित्रपट होता. जे व्यक्ती या चित्रपटाची निर्मिती करत होते, त्यांचा मी सन्मान करते. पण आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, बघतो त्या तशा अजिबात नसतात. अनेकांची मानसिकता ही सारखीच असते. यामुळे मला आशा आहे की, अधिकाधिक स्त्रियांनी या क्षेत्रात आपले स्थान आणि अधिकारात बळकट करावेत. जेणेकरून अधिकाधिक गोष्टी बदलतील", असेही राधिकाने सांगितले.

"जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सतत सल्ला दिला जायचा. सुरुवातीला मला प्रचंड दबाव आला होता. अनेकांनी पहिल्याच भेटीमध्ये मला नाकाची सर्जरी कर, तर दुसऱ्या भेटीत तुझ्या स्तनाची सर्जरी करुन घे", असा सल्लाही मला दिला होता", असा गौप्यस्फोट राधिकाने केला.

त्यापुढे ती म्हणाली, "हे सत्र आजही असंच पुढेही सुरु आहे. आजही कित्येक जण मला सर्जरी कर, असा सल्ला देतात. मी कित्येकदा तो ऐकला आहे.

"पण मला केसांना कलर करायलाच तीस वर्ष लागली. या गोष्टींसाठी मी साधं इंजेक्शन देखील घेणार नाही." असे राधिका म्हणाली.

"मला या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग यायचा. पण यामुळेच मी माझ्या शरीरावर अधिकाधिक प्रेम करु लागले." असे राधिका म्हणाली.

दरम्यान राधिका लवकरच 'फॉरेंसिक' या चित्रपटात झळकणार आहे. यात ती अभिनेता विक्रांत मेसीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

Updated : 16 Jun 2022 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top