Home > Entertainment > "Ghar Banduk Biryani" चालचं बिघडवायची..

"Ghar Banduk Biryani" चालचं बिघडवायची..

Ghar Banduk Biryani चालचं बिघडवायची..
X

नागराज मंजुळे म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे ग्रामीण भाषेतील सिनेमा. ग्रामीण पोशाख ग्रामीण कथा आणि सर्वसामान्य आपल्या महाराष्ट्रातील माणसं... अशा सिनेमांमुळे नागराज मंजुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. नागराज मंजुळे यांचा सैराट हा सिनेमा याने अख्ख्या भारतात धुमाकूळ घातला .त्यानंतर झुंड हा चित्रपट सुद्धा चाहत्यांच्या मनात घर करून गेला. पण आता नागराज मंजुळे यांनी घर बंदूक बिर्याणी हा नवा सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे.

सात एप्रिल रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे .पण त्या आधीच या सिनेमाच्या ट्रेलर ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे मराठी सिनेमा सृष्टीत एक वेगळं वलय हा सिनेमा तयार करू शकतो असं चाहत्यांनी हा ट्रेलर पाहून म्हटल आहे .सैराट चित्रपटातील परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा या चित्रपटात असणार आहे त्याचबरोबर सयाजी शिंदे आणि स्वतः नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे

नागराज मंजुळे यांच्या भाषेवरूनच अनेकदा सर्वसामान्य लोक त्यांना आपलंसं करतात. सैराट ,झुंड याप्रमाणेच घर बंदूक बिर्याणी सुद्धा प्रेक्षक मनापासून पसंद करतील असाच माहोल या सिनेमाची ट्रेलर ने तयार केला आहे.


Updated : 19 March 2023 5:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top