Home > Entertainment > गौतमी पाटीलचा वन पीस लूक !

गौतमी पाटीलचा वन पीस लूक !

गौतमी पाटीलचा वन पीस लूक !
X

लोकप्रिय डान्सर आणि मोहक आदांसाठी फेमस असलेली स्टार गौतमी पाटीलचे वन पीसमधील फोटो सोशल मीडियावर धूम करत आहेत. नेहमी नववारी साडीत दिसणारी गौतमी वनपीस मध्ये कशी दिसते हे पाहायलाय का ?

महाराष्ट्राची लावणी स्टार गौतमी पाटील सध्या फिरण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. डान्स शोमुळे व्यस्त असणाऱ्या गौतमीने निवांत वेळेत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती कुठेतरी बाहेर फिरताना दिसत आहे. पिवळ्या रंगाचा वन पीस ड्रेस, डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर हॅट अशा लूकमध्ये गौतमी अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

गौतमीच्या या फोटोंवर काही तासात 1 लाख 72 हजार लाईक्स आल्या असून कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. अनेक चाहते गौतमीच्या सौंदर्याची आणि स्टायलची प्रशंसा करत, गौतमीला काही सल्ले देत तिची प्रशंसा देखील करत आहेत. "सबसे कातिल गौतमी पाटिल" अशी कॉमेंट एका चाहत्याने केली असून दुसऱ्याने तिला "तेवढी तुम्ही रम्मी ची जाहिरात करायला नको होती मॅडम असा सल्ला दिला आहे". तथापि, गौतमीने फोटो शेअर केले असले तरी कुठे फिरायला गेली याचे लोकेशन मात्र शेअर केले नाही.

गौतमी पाटील महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर आणि रिलस्टार आहे. गौतमी पाटील तीच्या लावणी नृत्यासाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ओळखली जाते. तुम्हाला हां व्हिडिओ कसा वाटला..

Updated : 15 April 2024 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top