Home > Entertainment > ex-wife किरण रावने साजरा केला आमिर खानचा वाढदिवस

ex-wife किरण रावने साजरा केला आमिर खानचा वाढदिवस

ex-wife किरण रावने साजरा केला आमिर खानचा वाढदिवस
X

नुकताच पार पडलेला अनंत अंबानी Anant Ambani आणि राधिका मर्चंट Radhika Marchant यांच्या लग्नसोहळ्यात आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिन्ही कलाकारांनी हजेरी लावून धमाल केली होती. हे तिन्ही स्टार जेंव्हा एका मंचावर येतात तेंव्हा तेंव्हा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान 14 तारखेला 59 वर्षांचा झाला. पण वाढदिवसाच्या पार्टीत वय हा नंबर फक्त एक आकडा ठरला. त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये धमाल आणि हास्य यांचा बोलबाला होता.




बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 59 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे, या वाढदिवसाला आमिरसोबत त्याची ex-wife किरण राव ही सहभागी होती. त्यांच्यासोबत होता त्यांचा 'लापता लेडीज' या चित्रपटाच्या टीमचा उत्साह. केक कापला गेला, गाणी झाली आणि हास्यकल्लोळ झाला. पापाराझींच्या कॅमेऱ्यातही आमिरचा तो आनंद कैद झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बर्थ-डे सेलिब्रेशन दरम्यान केक कापल्यानंतर आमिर खानने स्वत: एक्स वाईफ किरण रावला केक भरवला. तसेच लापता लेडिज सिनेमातील कलाकार स्पर्श, प्रतिभा आणि नितांशी यांना देखील त्यानं केक दिला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान आमिर खानने उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. त्याने 'लापता लेडिज' चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.

आमिरने नेहमीच आपल्या चित्रपटांच्या निवडीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'कयामत से कयामत तक' पासून 'दंगल'पर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आगामी काळातही त्याच्याकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहे. पण आजचा दिवस फक्त आमिरचा आनंद आणि जल्लोष साजरा करण्याचा होता. त्याच्या चाहत्यांसोबत त्याची ex-wife किरण आणि 'लापता लेडीज' टीमनेही त्याच्या या आनंदात सहभाग घेतला.

बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान लवकरच 'सितारे जमीन पर' या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तारे जमीन पर' सारख्या लोकप्रिय चित्रपटाशी शीर्षकात साम्य असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Updated : 15 March 2024 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top