Home > Entertainment > पाठक बाईंची बुलेट सवारी, राणादा म्हणतो वा बुलेट क्वीन

पाठक बाईंची बुलेट सवारी, राणादा म्हणतो वा बुलेट क्वीन

पाठक बाईंची बुलेट सवारी, राणादा म्हणतो वा बुलेट क्वीन
X

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर सक्रीय असते. अक्षयाने एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एकदम रावडी अंदाजात बाईक राईड करताना दिसून येते.

अक्षया देवधरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती बुलेट चालवताना दिसतेय. या व्हिडीओत जिन्स आणि पिवळ्या रंगाचं 'चिल्ल' लिहिलेलं टी शर्ट, गॉगल आणि हेलमेट असा पेहराव अक्षयाने केलाय. या पेहरावात ती एकदम रावडी दिसते.

या व्हिडीओला कॅप्शन देत अक्षयाने 'मीट नेत्रा' असं म्हटलं आहे. अक्षया लवकरच आपल्या साठी एक ऑडीओ स्टोरी घेऊन येत आहे. सायली केदार लिखित ही कथा आपल्याला अक्षया देवधरच्या आवाजात स्टोरी टेल मराठीवर ऐकायला मिळणार आहे. कॉलेजच्या विविध झोलवर आधारित असलेल्या या कथेच नाव 'झोलर' असं आहे. यामध्ये अक्षयाने आवाज दिलेलं नेत्रा हे अगदी रावडी पात्र आहे.

दरम्यान, अक्षयाच्या या व्हिडीओ खाली राणादा म्हणजेच हार्दीक जोशी ने 'वावा बुलेट क्वीन' अशी कमेंट केली आहे.

Updated : 24 Jun 2021 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top