Home > Entertainment > ती काही वेळा विराटचे कपडे घालते !

ती काही वेळा विराटचे कपडे घालते !

ती काही वेळा विराटचे कपडे घालते !
X

अनुष्का शर्मा Anushka Sharma आणि विराट Virat Kohali कोहली हे क्रिकेट जगातलं सर्वात लोकप्रिय जोडपं आहे. त्यांचं प्रेम आणि लग्न नेहमीच चर्चेत असतं. नुकतीच, अनुष्काने एका मुलाखतीत एक रहस्य उघड केलं आहे. अनुष्का शर्मा काही वेळा विराटचे कपडे घालते असं अनुष्का शर्मानेच एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.

काय आहे कारण?

अनुष्कानं सांगितलं की, विराटला जेव्हा ती त्याचे कपडे घालते तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तिलाही ते आवडतं. ती म्हणाली, "कधी कधी मी त्याच्या कपाटातून टी-शर्ट किंवा जॅकेट घेऊन घालते. मला त्याचे कपडे आवडतात आणि ते मला आरामदायी वाटतात."

अनुष्का आरसीबीला लकी मानली जाते!

अनुष्काने नुकताच आपला 36 वा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी RCBचे काही खेळाडू उपस्थित होते. या दोन सामन्यांपासून अनुष्का स्टेडियममध्ये येत आहे आणि अनेकांचा असा विश्वास आहे की तिची उपस्थिती RCBसाठी लकी आहे. कारण, जेव्हापासून ती स्टेडियममध्ये येऊ लागली तेव्हापासून RCBने दोन्ही सामने जिंकले आहेत.

प्रेम आणि सपोर्टचं प्रतीक!

अनुष्का आणि विराट नेहमीच एकमेकांसाठी आधारस्तंभ राहिले आहेत. हे छोटंसं रहस्य त्यांच्या प्रेम आणि एकमेकांसाठी असलेल्या सपोर्टचं प्रतीक आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या या लव्हबर्ड कपलबद्दल तुमचं काय मत आहे?

Updated : 7 May 2024 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top