Home > Entertainment > दिशा आणि राहुलचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले...

दिशा आणि राहुलचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले...

दिशा आणि राहुलचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले...
X

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा परमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशा परमारचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर पाहिले जातात. दिशा परमारने अलीकडेच गायक राहुल वैद्य सोबत लग्न केलं आहे. त्यानंतर ती अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करते. त्याचबरोबर, आजकाल ती पती राहुलसोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे, जिथून तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही अतिशय रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.

दिशा परमारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही खूप रोमँटिक दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये हे जोडपे खुल्या आकाशामध्ये 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातील 'सच कह रहा है दिवाना दिल' या गाण्यावर रोमँटिक डान्स करत आहे. व्हिडीओ सोबत जोडलेले हे गाणे स्वता: राहुल यांनी आपल्या आवाजात गायले आहे. यासोबतच, चाहत्यांना त्याचा हा सुंदर व्हिडिओ खूप आवडला आहे. यासोबतच, चाहत्यांना त्याचा हा सुंदर व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये 'खूप सुंदर' असं लिहिले आहे, तर दुसऱ्याने 'U guys set fire' असे लिहिले आहे.

Updated : 4 Oct 2021 4:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top