Home > Entertainment > २०२१ पासून दीपिकाचं एकही ट्विट नाही ,पण ती मात्र ट्विटरवर रोज असते ट्रेंडिंग

२०२१ पासून दीपिकाचं एकही ट्विट नाही ,पण ती मात्र ट्विटरवर रोज असते ट्रेंडिंग

२०२१ पासून दीपिकाचं एकही ट्विट नाही ,पण ती मात्र ट्विटरवर रोज असते ट्रेंडिंग
X

Deepika Padukone नेहमी ट्रेंडिंग असते .प्लॅटफॉर्म कोणताही असो .ट्विटर वर नेहमीच दीपिका टॉप ट्रेंडिंग मध्ये असते .पण दीपिकाच्या ट्विटरबद्दल एक सत्य जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला सुद्धा आश्यर्य वाटेल . दीपिकाने २ वर्ष होत आले एकही ट्विट केलं नाही आहे .तिची शेवटची पोस्ट २०२१ ची आहे. ती कोणती पाहा ?

दीपिकाने जरी ट्विट नाही केलं तरी तिचं एक fanpage आहे . त्यावर मात्र दीपिकाच्या विषयी प्रत्येक बातमीचे अपडेट दिलेले असतात .

इंस्टाग्रामला मात्र दीपिका भारतात ६ व्या क्रमांकावर आहे . तिला इंस्टाग्रामला 74.4M इतके फॉलोअर्स आहेत. पण ट्विटरवर नाराजी का ?

दीपिकाने JNU मधील विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले होते . त्यामुळे कदाचित दीपिकाचे करिअर सुद्धा धोक्यात येऊ शकत होते . पण तिला त्यावेळी कौतूकासोबत बोलणी सुद्धा खावी लागली होती .
त्याच्यानंतर ६ महिन्याने तिने ट्विटर वर एकही अपडेट केलेली दिसत नाही . तरीही ट्विटरला दीपिकाचे 27 million इतके फॉलोअर्स आहेत . दीपिका इतर सोशल मेडिया प्लॅटफॉर्म वर सक्रिय दिसते नुकतेच काही फोटोस तिने शेअर केले आहेत. त्याला लाखो पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे .
दीपिका पदुकोणचे चाहतेच इतके आहेत कि ,तिच्या ऑफिसिअल अकाउंट वरून जरी काही पोस्ट नाही झालं तरी सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम करताना दिसतात . ओम शांत ओम ते जबरदस्त चर्चेत आलेला पठाण इथपर्यंतचा दिपकाचा यशस्वी प्रवासच तिला नेहमी ट्रेंडिंग मध्ये ठेवत आहे ...

तुम्हाला यापेक्षा वेगळं काही वाटत असेल तर लगेच comment करा...

Updated : 19 Jun 2023 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top