Home > Entertainment > जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर कडून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शुभेच्छा..

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर कडून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शुभेच्छा..

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर कडून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शुभेच्छा..
X

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कारण जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आहे. सुरूवातीला जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी सुकेश चंद्रशेखर याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. काल न्यायालयात हजर राहण्यासाठी गँगस्टर सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यान त्याने नोरा फतेही खोटे आरोप करत असल्याचं म्हंटले आहे.

सुकेश म्हणाला, माझ्याकडून त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा...

खरे तर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सुकेशला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात प्रवेश करताना मीडियाने त्याला जॅकलिनबद्दल विचारले. यावर सुकेश म्हणाला की मी तिचा वापर केला असा आरोप करण्यामागे जॅकलीनची स्वतःची कारणे आहेत. जेव्हा सुकेशला विचारण्यात आले की, तुझे अजूनही जॅकलिनवर प्रेम आहे का? उत्तरात सुकेश म्हणाला, माझ्याकडून तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.

सुकेशने गुच्ची ब्रँडचा टी-शर्ट घातला होता

यादरम्यान सुकेशला नोरा फतेहीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाले की, नोरा फतेही ही खोटे आरोप करत आहे. याप्रकरणी दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. सुकेश कोर्टात जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये सुकेश गुच्ची ब्रँडचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला दिसत आहे. त्यांच्या मालमत्तेच्या लिलावाच्या मुद्द्यावर न्यायालयात सुनावणी झाली.

Updated : 15 Feb 2023 4:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top