Home > Entertainment > JNU विद्यापीठावरील आधारीत 'वर्तमानम' चित्रपटाला केरळ सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारले

JNU विद्यापीठावरील आधारीत 'वर्तमानम' चित्रपटाला केरळ सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारले

‘वर्तमानम’ हा चित्रपट JNU विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाच्या विषयावर आधारीत असल्याने भाजप त्यावरुन राजकारण करत असल्याचा आरोप चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आर्यदान शौकत यांनी केला आहे.

JNU विद्यापीठावरील आधारीत वर्तमानम चित्रपटाला केरळ सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारले
X

JNU विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाच्या विषयावर आधारीत 'वर्तमानम' या चित्रपटाला केरळ सीबीएफसी (सेन्सॉर बोर्ड) क्षेत्रीय कार्यालयाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाची कथा केरळमधील एका महिलेवर केंद्रीत असून ती स्वातंत्र्य आंदोलनासंदर्भात एका संशोधनासाठी केरळमधून दिल्लीतल्या जेएनयूमध्ये जाते आणि तेथील परिस्थिती टिपते, असा आहे.

या चित्रपटाचे निर्माता, पटकथा-लेखक-दिग्दर्शक आर्यदान शौकत यांनी चित्रपटाबाबत भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. आपल्या आरोपांत शौकत यांनी सेन्सॉर बोर्डवर असलेले भाजपच्या एससी गटाचे एक नेते व वकील वी. संदीप कुमार यांच्या एका ट्विटचा उल्लेख केला आहे.

या ट्विटमध्ये संदीप कुमार यांनी वर्तमानम या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्यामागील कारण शौकत हे या चित्रपटाचे लेखक व निर्माते असून त्यांच्या चित्रपटाचा विषय देशविरोधी आहे. सेन्सॉर बोर्डचा सदस्य असल्याने मी हा चित्रपट पाहिला पण या चित्रपटात जेएनयूमधील विद्यार्थी दलित व मुसलमानांवर होणार्या (कथित) अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करतात, असा विषय होता, त्याला माझा विरोध होता, असे म्हटले होते.

पण या ट्विटवर वाद झाल्याने नंतर संदीप कुमार यांनी हे ट्विट हटवले.

दरम्यान, संदीप कुमार यांना हा चित्रपट प्रसिद्ध होऊ नये असे वाटत असल्याने ते प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात होते, असा आरोप शौकत यांनी केला आहे. सेन्सॉर बोर्डावर बसलेल्या सदस्यांना चित्रपटाचे ज्ञान नसते, त्यांना आपला राजकीय अजेंडा चालवायचा असतो असा आरोप शौकत यांनी केला आहे. माझा चित्रपट एखाद्या विद्यापीठातील लोकशाही आंदोलनाचा विषयावर असेल तर तो राष्ट्रविरोधी कसा ठरू शकतो असा सवालही शौकत यांनी केला आहे.

Updated : 30 Dec 2020 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top