Home > Entertainment > Celebrity Wedding आपल्या आयुष्याची कमाई तो यांचा एक दिवसाचा खर्च

Celebrity Wedding आपल्या आयुष्याची कमाई तो यांचा एक दिवसाचा खर्च

Celebrity Wedding  आपल्या आयुष्याची कमाई तो यांचा एक दिवसाचा खर्च
X

बॉलीवुड मध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक बाँलीवुड सेलिब्रिटीनिं वेगवेगळ्या पद्धतिने लग्न करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. डेस्टीनेशन लग्न, लग्न सराई, लग्नासाठी उभा केलेला राजेशाही मंडप, लग्नात घातलेले कपडे, ज्वेलरी, अश्या गोष्टींन मुळे बॉलीवुड सेलिब्रिटी लग्नासाठी चर्चेत आले. अनेक बॉलीवुड जोडप्यांनी लग्न गाठ बांधुन चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. बॉलीवुड मधल्या अनेक सेलिब्रिटींनी महागडी लग्न केली त्यामध्ये टॉप ५ महागड्या लग्नावर नजर टाकूयात.


प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियांका चोप्रा ही बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री तसेच ति ग्लोबल आयकॉन आहे, तर निक जोनास हा अमेरिकेचा टॉपचा सेन्सेशनल पॉप स्टार आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा 2018 मध्ये जोधपूरच्या उमेध भवन पॅलेसमध्ये शाही पद्धतीने विवाह झाला होता. ज्याचे एका रात्रीचे भाडे 64 लाख रुपये होते. त्यांच्या लग्नाची तयारी ५ दिवस आधी सुरू झाली होती. प्रियांका-निकच्या सर्व पाहुण्यांसाठी पाच दिवस राहण्याचा खर्च तब्बल 3.2 कोटीं पर्यन्त झाला. प्रियांका आणि निक जोनासने त्यांच्या लग्नात 105 कोटी रुपये खर्च केला. आणि पॅलेसच्या मालकाला या भव्य लग्नातून 3 महिन्यांचा महसूल मिळाला.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात सुरुवातीच्या काळात प्रेम आणि ब्रेकअपचे नाते होते. ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेम फुलले आणि विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीतील टस्कनी येथील 'बोर्गो' रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नात विराट आणि अनुष्काने प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीचे पोशाख परिधान केले होते ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये होती. विराटने अनुष्काला एक कोटी रुपयांची अंगठी गिफ्ट म्हणून दिली. विराट-अनुष्काच्या लग्नात तब्बल 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला. बॉलिवूडचे हे कपल लग्नात इतके गोड दिसत होते की चाहत्यांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोवर भरभरून प्रेम दिल. आणि बॉलीवुड च लग्न म्हंटल्यावर विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं नाव काढल्या शिवाय राहवत नाही.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग


रणवीरला जवळपास 6 वर्षे वाट पाहायला लावल्यानंतर दीपिकाने लग्नाला होकार दिला. बॉलीवूडची नंबर वन हिरोईन, दीपिका पदुकोण आणि हमखास हिट ठरलेला रणवीर सिंग, यांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे या जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. दीपिका-रणवीरचा भव्य विवाह सोहळा इटलीतील विला डेल बाल्बियानो येथे पार पडला. येथे एका रात्रीच्या राहण्याचा खर्च सुमारे 25 लाख रुपये होता. दीपिका-रणवीरने त्यांच्या लग्नात तब्बल 95 कोटी रुपये खर्च केले.

कतरिना कैफ आणि विकी कौशल


कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली, विकी आणि कतरिना यांच्या भव्य लग्नाचे बजेट ०४ कोटी रुपये असून. एका रात्रीच्या सूटची किंमत 7 लाख रुपये होती. हॉटेलमध्ये त्याच किमतीचे आणखी दोन सूट आहेत आणि इतरही 15 सूट आहेत ज्यांची किंमत प्रत्येकी 4 लाख रुपये आहे. विकी आणि कतरिनाच्या ७ लाख रुपयांच्या सूटमध्ये एक खाजगी बाग आणि एक अप्रतिम दृश्य असलेला स्विमिंग पूल आहे. खोलीतून, जोडप्याला अरवली पर्वतरांगाच्या दृश्याचा आनंद घेता आला. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नासाठी किती खर्च आला ही अद्याप स्पष्ट नाही झाले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर


बॉलीवूड अभिनेता रनवीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच दुसर आकर्षित लग्न ठरल. डेस्टिनेशन वेडिंग ऐवजी आलिया आणि रणबीर कपूर यांनी मुंबईतील राहत्या बिल्डिंगमधील त्यांच्या घरी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत, घरात राहून कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद लुटणे हाच त्या मागच उद्देश होता. लग्नाचा एकूण खर्च अद्याप स्पष्ट नाही. पण आलिया आणि रणबीर च लग्न चाहत्यांसाठी आश्चर्यजनक होत. बॉलीवूडची ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी बनली आहे.

Updated : 11 Feb 2023 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top