Home > Entertainment > उर्वशी रौतेलाने मड बाथसाठी मोजले २० हजार रुपये

उर्वशी रौतेलाने मड बाथसाठी मोजले २० हजार रुपये

उर्वशी रौतेलाने मड बाथसाठी मोजले २० हजार रुपये
X

अभिनेत्री उर्वशी रौतेला बॉलिवूडमधे तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. उर्वशी चित्रपटांसह सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती बर्‍याचदा तिचे हॉट आणि सेक्सी फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. उर्वशीने सध्या इन्स्टाग्रामवर मड बाथ घेतानाचा फोटो शेअर केला असून नेटकऱ्यांनी त्याखाली भन्नाट कमेंट केल्या आहेत.

हा फोटो शेअर करताना उर्वशीने म्हटलय की, "माझी आवडती मड बाथ, स्पा, मड थेरपी. सुरुवातीच्या काळात क्लिओपेट्राला हे बाथ आवडत होतं. माझ्या सारखे मॉर्डन असलेले अनेकजण मड बाथ पसंत करतात. बेरिलीक बीचच्या लाल मातीचा आनंद घेतेय. रोमन देवी व्हीनस या मातीचा उपयोग आरशासाठी करायच्या. ही खनिजांनी समृद्ध अशी माती आहे जी त्वचेसाठी उत्तम आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली आहे."

या मड बाथमुळे त्वचेतील अशुद्धता निघून त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. तसचं त्वचेतील रक्ताभिसरण वाढल्याने त्वचा मुलायम होत असल्याचं उर्वशी तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. तसचं मड बाथमुळे शरीरातील थकवा कमी होतो असं उर्वशी तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय.


Updated : 15 Jun 2021 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top