Home > Entertainment > बॉलिवूड कलाकार आणि त्यांचा धुळवडीशी असलेला न्यारा संबंध

बॉलिवूड कलाकार आणि त्यांचा धुळवडीशी असलेला न्यारा संबंध

बॉलिवूड कलाकार आणि त्यांचा धुळवडीशी असलेला न्यारा संबंध
X

होळी हा रंगांचा सण, उत्साहाचा सण! पण बॉलिवूडमधील काही कलाकारांना धुळवडीशी असलेला संबंध थोडा वेगळा आहे. धुळवड हा सण सगळ्यांनाच आवडतो असं नाही. त्यातही बॉलिवूडची धुळवड ही सगळ्यात जास्त चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये बेधुंद धूळवड साजरी करणारे कलाकार ही आहेत आणि धुळवडीपासून दोन हात दूर राहणारे देखील कलाकार आहेत. पण तुम्हाला माहितीये का काही कलाकार आहेत ज्यांना धुळवड खेळायला आवडत नाही. त्यांना रंगांनपासून लांब रहायला आवडतं. तर कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या!

बॉलीवूडमध्ये ज्यांना धुळवड खेळायला आवडत नाही, त्यामध्ये रणबीर कपूर हा कलाकार अग्रभागी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरलाही होळी खेळायला आवडत नाही. 'बलम पिचकारी' या गाण्याच्या शूटिंगनंतर त्याला रंगांचा त्रास झाल्यामुळे त्याने होळीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

तर करण जोहर 10 वर्षांचा असताना होळीमध्ये कोणीतरी त्याच्यावर अंडी फोडली आणि त्याला त्रास झाला. म्हणून या घटनेनंतर करण जोहरने होळी खेळणं बंद केलं.

तापसी पन्नू लहानपणापासूनच रंगांपासून दूर राहते. आता तर तिला होळीसाठी वेळही नसतो,असं म्हटलं जात.

दुसरी अभिनेत्री आहे श्रुती हासन, श्रुती हासनलाही रंगांपासून लांब रहायला आवडतं. तिचं असं म्हणणं आहे की होळी खेळणं म्हणजे पाणी वाया घालवणं आहे. पाणी वाया जाऊ नये म्हणून श्रुती हासन धूळवड खेळत नसल्याचं सांगितलं जातं.

अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहम पण यापासून कोसोदुर नाही, त्याला होळी खेळणं मुळीच आवडत नाही. त्याला असं वाटतं की होळी खेळणं म्हणजे पाणी वाया घालणं आहे. शिवाय, रंगांमुळे निसर्गालाही हानी पोहोचते. असं अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहमचं म्हणण आहे.

तर स्टायलिश अभिनेता रणवीर सिंगलाही होळी खेळायला आवडत नाही. त्याला वाटतं की रंगांमुळे निसर्गावर वाईट परिणाम होतात.

करीना कपूरने तर राज कपूर यांच्या निधनानंतर होळी खेळणं बंद केलं आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार धुळवडीचा आनंद घेत असताना, काही कलाकार मात्र रंगांपासून म्हणजेच धुळवडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात.

Updated : 22 March 2024 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top