Home > Entertainment > Big Boss 16 शिव ठाकरेचा नवीन बिझनेस नेमका आहे तरी काय?

Big Boss 16 शिव ठाकरेचा नवीन बिझनेस नेमका आहे तरी काय?

Big Boss 16 शिव ठाकरेचा नवीन बिझनेस नेमका आहे तरी काय?
X

"बिग बॉस 16" एक महिन्यापूर्वी संपले,तरीही शिव ठाकरे अजूनही चर्चेत आहे. अलीकडेच त्याने एका नवीन ऑटोमोबाईलवर लाखो रुपये खर्च केले. त्याने आता आपला नवीन व्यवसायही सुरू केला आहे.

"ठाकरे टी अँड स्नॅक्स" हे त्याच्या नवीन कंपनीचे नाव आहे. त्याने हसलर हॉस्पिटॅलिटीशी कोलॅबरेट केलं आहे. विशेष म्हणजे याच कंपनीसोबत अब्दू रोजिक याने बॉम्बेमध्ये स्वतःचे 'बर्गर' रेस्टॉरंटही देखील सुरू केले आहे.

"ठाकरे चाय आणि स्नॅक्स"हा ब्रँड शिवने नुकताच लॉन्च केला. हे रेस्टॉरंट खाण्या-पिण्याची या दोन्हीसाठी परिपूर्ण बनवले आहे. 25 हून अधिक विविध प्रकारचे चहा आणि स्नॅक्स उपलब्ध आहेत. ठाकरे चाय आणि स्नॅक्स इंस्टाग्राम अकाउंटवर ही याबद्दल बातमी आणि फोटो पोस्ट केले आहेत. या लोगोमध्ये शिवचे फोटो लावण्यात आले आहे. आणि लोकांनी याला खुप पसंदी दाखवली आहे.

शिवने 6 दिवसांपूर्वी नवीन गाडी विकत घेतली. तसेच, त्याचे फोटो आणि व्हीडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने नमूद केले आहे की दोन सेकंड हँड गाडी खरेदी केल्यानंतर शेवटी त्याने नवीन कार खरेदी केली. आता गाडी ढकलायची गरज लागणार नाही.

दरम्यान, अब्दू रोझिकनेही लोकप्रियतेच्या बाबतीत "बिग बॉस 16" मधून खूप लोकप्रियता मिळवली. शो सोडल्यानंतर, तो अभिनेता म्हणून अनेक संगीत व्हिडिओंमध्ये दिसला. मुंबईत त्यांने एक रेस्टॉरंटही सुरू केले. रमजान सुरू असल्याने तो सध्या कुटुंबासह दुबईत आहे. नुकताच त्याने आपल्या भावासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Updated : 23 March 2023 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top